Tirupati Laddu Row : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात माशांचा तेलाचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यावरून आंध्र प्रदेशमध्ये राजकारणही तापलं आहे. दरम्यान, या आरोपांवर आता लाडूसाठी तूप पुरवणाऱ्या कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

“आमच्यावरील आरोप हास्यास्पद”

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने कायदेशीर कारवाई सुरू केल्याच्या एक दिवसानंतर कंपनीने या आरोपांचे खंडन केलं आहे. यासंदर्भात कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रमुख कानन यांनी शुक्रवारी एका तामिळ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. “खरं तर आमच्या कंपनीवर झालेले आरोप चुकीचे आहे. कारण माशांचे तेल तुपापेक्षा महाग आहे. तसेच अशी कोणतीही भेसळ जर तुपात केली, तर नुसत्या वासावरून ती ओळखता येऊ शकते, त्यामुळे हे आरोप हास्यास्पद आहे”, असे ते म्हणाले.

Forfeiture action by Vasai virar Municipal corporation against property owners who keep arrears of property tax
मालमत्ता थकबाकीदारांना पालिकेचा दणका; पालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरवात
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Murder of petrol pump owner of Virar two accused arrested by crime branch team
विरारच्या पेट्रोलपंप मालकाची हत्या, गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोन आरोपींना अटक
SEZ company objected to decision to return land purchased by farmers
उरण : जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यास सेझ कंपनीची हरकत,पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली
Why change in sugar control order is needed after 58 years
साखर नियंत्रण आदेशात ५८ वर्षांनी बदलाची गरज का? नवीन तरतुदी काय आहेत?
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
mhada redevelopment project house cheaper
म्हाडाची घरे आता स्वस्त; वरळी, ताडदेवमधील घरांच्या किमतीत कपात
Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge : खरगे कुटुंबाच्या संस्थेला चुकीच्या पद्धतीने जमीन हस्तांतर केल्याचा भाजपाचा आरोप; सिद्धरामय्यांनंतर मल्लिकार्जुन खरगेंना घेरण्याचा प्रयत्न?

हेही वाचा – Tirupati Balaji Prasad Ladoo : तिरुपती बालाजीच्या प्रसादाचे लाडू कसे तयार होतात? ‘पोटू’ नेमकं काय आहे?

“नॅशनल लॅबमध्ये आमच्या तुपाचे नमुने पाठवण्यात आले होते”

पुढे बोलताना, “ज्यावेळी आम्हाला तिरुपती बालाजी देवस्थानासाठी तूप पुरवण्याचे कंत्राट मिळालं, त्यावेळी देवस्थानातील चार तज्ज्ञांच्या टीमने आमच्या कंपनीला भेट दिली होती. त्यावेळी गुणवत्ता तपासूनच त्यांनी आम्हाला कंत्राट दिलं होतं. याशिवाय नॅशनल लॅबमध्येही आमच्या तुपाचे नमुने पाठवण्यात आले होते”, असेही त्यांनी सांगितले.

“तूप पुरवणं हा आमच्यासाठी व्यवसाय नाही, तर श्रद्धेचा विषय”

“आम्ही १९९८ पासून या व्यवसायात आहोत. मात्र, अशाप्रकारचे आरोप पहिल्यांदाच आमच्यावर करण्यात आले आहेत. हे दुर्देवी आहे. आमच्याकडे जेव्हा दूध येते, तेव्हा त्याची योग्य ती चाचणी केली जाते. या चाचणीत जर दुध योग्य नाही, असं आढळून आलं, तर ते तात्काळ परत पाठवल्या जाते”, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच “तिरुपती बालाजी देवस्थानाच्या प्रसादासाठी तूप पुरवणं हा आमच्यासाठी केवळ व्यवसाय नाही, तर श्रद्धेचा विषय आहे”, असेही ते म्हणाले.