Tirupati Rule: आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची छोटी मुलगी पोलिना अंजनी कोनिडेला यांनी यांनी बुधवारी पवन कल्याण यांच्यासह तिरुपती मंदिरात जाण्याआधी अहिंदू दाखल्यावर सही केली. तिरुमला तिरुपती मंदिराच्या नियमांनुसार या मंदिरात अहिंदू व्यक्तीला जर या मंदिरात प्रवेश करायचा असेल तर एका दाखल्यावर सही करावी ( Tirupati Rule ) लागते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिना ही पवन कल्याण यांची तिसऱ्या पत्नीपासून झालेली मुलगी आहे

पोलिना ही पवन कल्याण यांच्या तिसऱ्या पत्नीपासून झालेली मुलगी आहे. मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या घोषणापत्रावर पोलिनाने सही केली. पोलिना तिचा भाऊ मार्कसह राहते. रेणु देसाई आणि पवन कल्याण यांची मुलगी आद्याही पोलिनासह मंदिरात दर्शनासाठी पोहचली. जनसेवा पार्टीने पवन कल्याण आणि पोलिना यांनी मंदिराच्या अहिंदू अर्जावर सही केल्याचे फोटो पोस्ट केले आहे. पक्षाने म्हटलं आहे की पवन कल्याण यांची मुलगी पोलिनाने तिरुमला तिरुपती मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी अहिंदू असल्याच्या प्रमाणपत्रावर सही ( Tirupati Rule ) केली आहे. पोलिना अल्पवयीन असल्याने तिचे वडील पवन कल्याण यांचीही या अर्जावर ( Tirupati Rule ) सही आहे.

हे पण वाचा- Tirupati Laddu Row : “जेवणात लाडू नसतील अशी आशा आहे”… जेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही हास्यविनोद करतात!

तिरुपती बालाजी मंदिर प्रसाद लाडूंमुळे चर्चेत

तिरुपती बालाजी मंदिर सध्या लाडू वादामुळे देशभरात चर्चेत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर जगन हे मुख्यमंत्री असताना तिरुपती मंदिराच्या प्रसाद लाडूंमध्ये भेसळ झाल्याचा आणि जनावरांची चरबी वापरली गेल्याचा आरोप केला होता. त्यावरुन देशभरात एकच खळबळ उडाली होती. जगन मोहन रेड्डींनी हे आरोप फेटाळले होते. मात्र लाडूचे जे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते त्यात जनावरांची चरबी असल्याची बाब उघड झाली होती. यानंतर पवन कल्याण यांचीही प्रतिक्रिया समोर आली होती. तिरुमला तिरुपती मंदिरातले प्रसाद लाडू हे पवित्र मानले जातात. मागच्या सरकारच्या भ्रष्ट वृत्तीमुळे हा पवित्र प्रसाद अशुद्ध झाला. ही बाब म्हणजे एक प्रकारचा कलंक आहे या आशयाचं वक्तव्य पवन कल्याण यांनी केलं होतं.

सनातन धर्मावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक माणसाने तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये जी भेसळ झाली त्याबद्दल प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. मी माझं प्रायश्चित घेत आहे, त्यानंतर मी तिरुपती मंदिरात जाईन असं पवन कल्याण यांनी म्हटलं होतं. त्यानुसार ते मुलगी पोलिनासह मंदिरात आले होते. जिथे पोलिनाने अहिंदू दाखल्यावर सही ( Tirupati Rule ) केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tirupati rule andhra deputy cm pawan kalyan daughter signed declaration before visiting tirupati balaji temple scj