गेल्याच आठवड्यात पश्चिम बंगालच्या अरियादाह भागात तृणमूल काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने एक महाविद्यालयीन तरूण आणि त्याच्या आईला मारहाण केल्याचं प्रकरण उजेडात आलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयंत सिंह याने ४ जुलै रोजी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. आता पुन्हा एकदा जयंत सिंहचाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये जयंत सिंह आणि त्याचे सहकारी एका व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. यावरून आता पश्चिम बंगालमधील राजकारण तापू लागलं असून भाजपानं सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार पश्चिम बंगालच्या नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातल्या कामरहाटीमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. याच ठिकाणी गेल्या आठवड्यात जयंत सिंहनं एक तरुण व त्याच्या आईला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. सध्य व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जयंत सिंह व त्याचे काही सहकारी एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. यात त्याच्या चार सहकाऱ्यांनी पीडित व्यक्तीचे हात व पाय पकडले असून त्याला उलटं पकडल्याचं दिसत आहे. तसेच, इतर दोन जण या व्यक्तीला बांबूने मारत आहेत. पीडित व्यक्ती जिवाच्या आकांताने ओरडत असूनही मारहाण मात्र चालूच आहे.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
melghat assembly constituency
मेळघाटात दोन माजी आमदारपुत्रांमध्‍ये पुन्‍हा लढाई

भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून मारहाण होत असलेली व्यक्ती एक महिला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पीएम आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच ११ विवाहित महिलांनी प्रियकरासह केला पोबारा; पतींची पोलिसांत तक्रार!

“कामरहाटीच्या तालतला क्लबमधील हा व्हिडीओ पाहून प्रचंड संताप येत आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार मगन मित्रा यांचा जवळचा सहकारी असणारा जयंत सिंहनं एका युवतीवर हल्ला केला आहे. महिलांच्या हक्कांबाबत नेहमीच मोठ्या गोष्टी बोलणाऱ्या सरकारच्या नाकाखाली हा असा भीषण प्रकार घडणं हे मानवतेवर मोठा कलंक आहे”, असं सुकांता मुजुमदार यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये नमूद केलं आहे. मुजुमदार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओची लोकसत्ता डॉट कॉमनं खातरजमा केलेली नाही.

घटना तीन वर्षांपूर्वीची?

दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना तीन वर्षांपूर्वीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. “आम्ही या व्हिडिओची खातरजमा करत असून मारहाण करणाऱ्या व्यक्ती व मारहाण होणारी व्यक्ती नेमके कोण आहेत? याचा तपास करत आहोत. ती व्यक्ती पुरुष आहे की महिला याचाही तपास केला जात आहे. ही घटना कदाचित मार्च २०२१ मध्ये घडली असावी. तेव्हा एक पुरुष व एका महिलेला क्लबजवळ चोरीच्या संशयावरून पकडण्यात आलं होतं. ही तीच घटना आहे का? याचा आम्ही शोध घेत आहोत”, अशी माहिती बराकपूर पोलीस आयुक्तालयातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे.

तृणमूल काँग्रेसचा प्रतिहल्ला

एकीकडे तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांची या घटनेवर प्रतिक्रिया मिळू शकलेली नसताना पक्षप्रवक्ते रिजू दत्ता यांनी हे आरोप फेटाळले आहेत. “हा मार्च २०२१ चा जुना व्हिडीओ आहे. आरोपी जयंत सिंह आणि त्याचे सहकारी हे सध्या तुरुंगात आहेत. व्हिडीओत दिसणारी पीडित व्यक्ती कदाचित पुरुष असावी. याचा तपास चालू आहे. पण बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तृणमूलवर टीका करण्याची एकही संधी भाजपा सोडत नाही. असे वेगवेगळे व्हिडीओ पुढे करून तृणमूलची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे”, असं दत्ता म्हणाले.