पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगना जिल्ह्यामधील मिनाख येथील तृणमूल काँग्रेसचे नेता अबू हुसैन गायेन यांच्या घरात एक विचित्र अपघात घडला आहे. गायेन यांच्या घरातील बॉम्बला चेंडू समजून त्याबरोबर खेळणाऱ्या घरातील एका चिमुकलीचा बॉम्बचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातामध्ये काही मुलं जखमी झाली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अबु हुसैन यांना अटक केली आहे. ही घटना चपाली गावामध्ये घडली. पोलिसांना या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

“बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तृणमूल काँग्रेसचे नेते अबुल हुसैन गायेन यांच्या घरी काही नातेवाईक आले होते. यामध्ये नातेवाईकांमध्ये त्यांच्या आठ वर्षांच्या भाचीचाही सामवेश होता. झूमा खातून असं या भाचीचं नाव असून ती दुसऱ्या इयत्तेतमध्ये शिकत होती. ही मुलगी गायेन यांचं पाळीव गाढव बांधून ठेवण्यात आलेल्या ठिकाणी गाढावच्या डोक्याजवळ बांधलेल्या बॉम्बशी चेंडू समजून खेळत होती. त्याचवेळी या बॉम्बचा स्फोट झाला आणि झूमाचा जागीच मृत्यू झाला,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
Loksatta natyrang  Personality Suryacha Pille Three act play Directed
नाट्यरंग: सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका

बशीरहाटचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक सौथम बॅनर्जी आणि एसडीपी अमीन इस्लाम यांच्या नेतृत्वामध्ये मिनाखाचे पोलीस स्थानक प्रमुख सिद्धार्थ मंडल यांनी मोठ्या फौजफाट्यासहीत मुख्यमंत्री मतता बॅनर्जींच्या पक्षाचे नेते असलेल्या गायेन यांच्या घरी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पहाणी करुन झूमाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर हा मृतदेह ग्रामी रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला होता. या अपघाताची पंचक्रोषीमध्ये चर्चा आहे. गायेन यांनी गाढवाच्या कपाळावर बॉम्ब का बांधला होता? हे राजकीय षडयंत्र आहे का? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गायेन यांनी पंचायत निवडणुकीमध्ये आपला दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीने घरात बॉम्ब जमा केले होते अशी माहिती दिली.

गायेन यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गावातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरातच झालेल्या या स्फोटामुळे गावात दहशतीचं वातावरण आहे.

आठडाभरापूर्वी घडला असाच प्रकार
६ नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगालमधील डेगंगामध्ये तृणमूलच्या नेत्याच्या घरीच बॉम्बस्फोट झाला होता. पोलिसांनी या घटनेसंदर्भात माहिती देताना काही मजूर स्थानिक तृणमूल नेत्याच्या मालकीच्या बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचं काम करत असताना स्फोट झाल्याचं सांगितलं. बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या शिड्यांखाली काही बॉम्ब ठेवण्यात आले होते. हे बॉम्ब असल्याची कल्पना मजूरांना नव्हती. त्यांनी या बॉम्बला हात लावताच मोठा स्फोट झाला. यामध्ये दोन मजूर गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारांसाठी विश्वानथपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. दोघांचीही प्रकृती स्थीर आहे. यानंतरच्या छापेमारीत पोलिसांनी तीन जिवंत बॉम्ब घटनास्थळावरुन जप्त केले.

Story img Loader