तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभेचे माजी खासदार कीर्ती आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोषाखाची तुलना महिलेच्या पोषाखाशी केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला गेला. आझाद यांच्या या टिप्पणीनंतर भाजपानेही आक्रमक पवित्रा धारण केला होता. दरम्यान, वाढत्या टीकेमुळे आता कीर्ती आझाद यांनी त्यांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे. माझ्या टिप्पणीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे कीर्ती आझाद म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “आम्ही ज्या राज्यात गेलो, तिथे…”, ‘भारत जोडो’ यात्रा दिल्लीत पोहोचताच राहुल गांधींचं विधान; BJP-RSS वरही सोडलं टीकास्र

कीर्ती आझाद नेमंक काय म्हणाले होते?

मेघालय दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमादरम्यान तेथील पारंपरिक पोषाख परिधान केला होता. याच पोषाखाची तुलान कीर्ती आझाद यांनी एका महिलेच्या पोषाखाशी केली होती. त्यांच्या या तुलनेनंतर भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला होता. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी कीर्ती आझाद यांच्यावर टीका केली होती. आझाद यांनी मेघालयच्या संस्कृतीचा अपमान केला आहे, असा आरोप शर्मा यांनी केला होता. तसेच तृणमूल काँग्रेस पक्ष आझाद यांचे समर्थन करतो का? याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.

हेही वाचा >>> Charles Sobhraj Exclusive: “दहशतवादी मसूदला सोडवण्यासाठी कंदहारला भारताचं विमान ओलीस ठेवलं गेलं होतं, तेव्हा प्रवाशांना काही होऊ नये म्हणून….”

कीर्ती आझाद यांनी मागितली माफी

दरम्यान, कीर्ती आझाद यांनी त्यांनी केलेल्या टिप्पणीसंदर्भात माफी मागितली आहे. “मी केलेल्या ट्वीटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. माझ्या ट्वीटमुळे ज्या लोकांच्या भावना दुखावल्या त्यांची मी माफी मागतो. आपल्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीबद्दल मला आदर आहे. मी केलेल्या टिप्पणीमुळे लोकांचे मन दुखावले, त्याबद्दल मी दु:ख व्यक्त करतो. संविधानिक मुल्यांवर चालण्याच्या माझ्या प्रतिज्ञेचा मी पुनरुच्चार करतो,” असे म्हणत कीर्ती आझाद यांनी माफी मागितली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc leader kirti azad apologize compare pm narendra modi attire with women prd
Show comments