Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी सीमा सुरक्षा दलावर (बीएसएफ) राज्य अस्थिर करण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना मदत केल्याचा आरोप केला आहे. अवैध घुसखोरांना राज्यात घुसवले जात असून तृणमूल काँग्रेसवर ठपाका ठेवला जात आहे असेही बॅनर्जी म्हणाल्या आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी केंद्र सरकार आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) वर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की केंद्राच्या षडयंत्राचा भाग म्हणून बीएसएफ बांगलादेशी दहशतवाद्यांना बंगालमध्ये शिरकाव करण्याची परवानगी देत आहे, ज्यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “बीएसफ विविध भागांमधून बंगालमध्ये घुसखोरी होऊ देत आहे आणि महिलांना त्रास दिला जात आहे. सीमा आमच्या नियंत्रणात नाही, त्यामुळे जर कोणी टीएमसीवर घुसखोरीचा आरोप करत असेल तर मी स्पष्ट करते की ही जबाबदारी बीएसएफची आहे. टीएमसीला दोष देऊ नये.” तसेच त्यांनी बीएसएफ घुसखोरांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहे. याचा उद्देश पश्चिम बंगाल अस्थिर करणे आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे बोलताना म्हणाल्या की, “लोक बीएसएफ इस्लामपूर, सीताई, चोप्रा या मार्गाने घुसखोरी करत आहेत, आमच्याकडे बातम्या आहेत. तुम्ही याचा विरोध का करत नाहीत? जर कोणाला वाटत असेल की ते बंगालमध्ये धुसखोरी करत आहेत आणि तृणमूल काँग्रेसला बदनाम करत आहेत. तर त्यांना हा इशारा समजावा की काँग्रेस असे काम करत नाही. बीएसएफच्या चुकीच्या कामांना समर्थन देऊन तृणमूल काँग्रेसला शिव्या देऊ नका”.

हेही वाचा>> Suresh Dhas : “बिंदु नामावलीची बीड जिल्ह्यात वास्तुशांती…”, सुरेश धस यांची संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींबाबत मोठी मागणी

ममता बॅनर्जी यांनी बीएसएफचे डीजी राजीव कुमार यांना निमलष्करी दल घुसखोरांना कथितपणे कुठे मदत करत आहे याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ममता बॅनर्जी यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांगलादेशातून होणारी घुसखोरी बंगालमधील शांतता भंग करत असल्याचा आरोप केला होता. बांग्लादेश आणि भारत यांच्यामध्ये ४०९६ किलोमीटर लांबीची सीमा आहे. ज्याचा मोठा भाग नद्या आणि जंगलांमुळे संवेदनशील आणि सुरक्षित आहे. या भागात घुसखोरीच्या घटना वारंवार होत असतात. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या या आरोपांवर बीएसएफ किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc leader mamata banerjee claims bsf helping infiltrators enter west bengal rak