शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी अटक केली. ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर पार्थ चॅटर्जी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चार वेळा फोन लावला. पण एकदाही फोन उचलण्यात आला नाही.

प्रकियेप्रमाणे, जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते, तेव्हा ती व्यक्ती आपला कुटुंबीय, नातेवाईक किंवा मित्र यांच्यापैकी एका व्यक्तीला फोन करुन माहिती देऊ शकतं. ईडी अटकेची कारवाई करत असताना पार्थ चॅटर्जी यांनी आपल्याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना फोन करुन अटकेची माहिती द्यायचं असल्याचं सांगितलं.

jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Rietesh Deshmukh
Riteish Deshmukh : “झापूक झुपूक वारं आलंय, गुलिगत धोका आहे”, धाकट्या बंधूसाठी थोरला बंधू प्रचाराच्या मैदानात!
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
melghat assembly constituency
मेळघाटात दोन माजी आमदारपुत्रांमध्‍ये पुन्‍हा लढाई
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

पश्चिम बंगालच्या मंत्र्याला दोन दिवसांची ‘ईडी’ कोठडी; शिक्षक भरती गैरव्यवहाराची चौकशी

यानंतर पार्थ चॅटर्जी यांनी मध्यरात्री २.३१,२.३३, ३.३७ आणि सकाळी ९.३५ ला असे चार फोन केले. पण एकदाही समोरुन उत्तर आलं नाही.

पार्थ चॅटर्जींना अटक कशासाठी?

शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणात पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची ईडी कोठडी सुनावली. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या चॅटर्जी यांना अटकेनंतर बंकशाल न्यायालयात हजर करण्यात आलं. शनिवारी ईडीचे विशेष न्यायालय बंद असल्याने त्यांना या न्यायालयात हजर करण्यात आलं. अटकेपूर्वी चॅटर्जी यांची त्यांच्या निवासस्थानी सुमारे २६ तास चौकशी करण्यात आली.

पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोगाच्या शिफारशींनुसार झालेली गट क आणि ड कर्मचाऱ्यांची भरती तसेच शासन प्रायोजित, अनुदानित शाळांत झालेल्या शिक्षकांच्या भरतीची चौकशी कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करीत आहे. या गैरव्यवहारातील पैशांच्या व्यवहारांचा मागोवा ईडीकडून घेतला जात आहे. ईडीने शुक्रवारी यासंबंधात सुमारे बारा जणांच्या घरांवर छापे टाकले. यात दोन मंत्र्यांचा समावेश आहे. या छाप्यांत सुमारे २० कोटी रुपयांची रोख जप्त करण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितलं.