पश्चिम बंगालमध्ये १ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं आणि प्रचारसभांमधून होणारे आरोप-प्रत्यारोप अजून तीव्र झाले. अजून ६ टप्प्यांचं मतदान बाकी असून प्रचाराचा हा ज्वर अधिकच वाढत जाण्याची चिन्ह आहेत. दुसऱ्या टप्प्यात खुद्द ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात देखील मतदान झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या खोचक टीकेवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच भडकल्या. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. “माझं पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगणं आहे की त्यांनी आधी गृहमंत्र्यांना (अमित शाह) सांभाळावं आणि नंतर आमच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करावा”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग गृहमंत्र्यांच्या इच्छेप्रमाणे काम करत असल्याची टीका याआधी ममता बॅनर्जी यांनी केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा