भोपाळ : ‘मी पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे की नाही? भाजपला मध्य प्रदेशात पुन्हा सत्तेत आणयचे का?’ असा सवाल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी जनतेला विचारला. डिंडोरी येथे एका जाहीर सभेस संबोधित करताना चौहान यांनी जनसमुदायालाच हा प्रश्न विचारला.
चौहान यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने शनिवारी त्यांना टीकेचे लक्ष्य केले. काँग्रेसने नमूद केले, की ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात अलीकडे केलेल्या दौऱ्यातील सभांमध्ये मुख्यमंत्री चौहान यांचा नामोल्लेख करणे टाळले आहे. म्हणून मोदींवर दबाव आणण्यासाठी चौहान यांनी असे प्रश्न थेट जनतेला विचारण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून चौहान यांना हटवण्यात आले आहे.’’