चांद्रयान ३ च्या यशस्वीतेनंतर भारत आता अंतराळात अंतराळवीर पाठवण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान, आपण अंतराळात लवकरच अंतराळवीर पाठवणार आहोत, असं इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत म्हणाले आहेत. यादरम्यान, त्यांनी अंतराळ कार्यक्रमासाठी भारताची महत्त्वाकांक्षी दृष्टी अधोरेखित केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नेहमीच अंतराळ प्रयत्नांसाठी मदत करतात. ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचं सहकार्य लाभलं आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या या परिषदेत बोलताना त्यांनी २०३५ पर्यंत अंतराळात भारतीय अंतराळ स्थानक उभारण्याचे उद्दिष्टही अधोरेखित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यावेळी म्हणाले, “चांद्रयान ३ चे यश आणि इस्रोचे मागील सहा महिन्यांतील सर्व प्रयत्न लक्षात घेऊन, पंतप्रधान मोदींनी आमच्यासाठी एक विशेष योजना तयार केली आहे. इस्रोच्या सध्याच्या प्रकल्पात यश मिळवण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

एस सोमनाथ पुढे म्हणाले, इस्रोचे उद्दिष्ट केवळ गगनयान मोहीम राबविणे नाही तर अंतराळात मानवी कार्य प्रस्थापित करणे देखील आहे, जेणेकरून २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवू शकेल. २०४० पर्यंतचा हा कालावधी फार मोठा वाटत असला तरीही तो प्रत्यक्षात फार मोठा नाही. २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक तयार करण्याचे आपले उद्दिष्ट्ये आहे. यामुळे, भारतीयांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षण परिस्थितीत संशोधन करण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करेल.

यावर्षी गगनयानाची चाचणी

भारतीय अंतराळ संस्था गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. २०२५ पर्यंत या गगनयानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे, त्यासाठी २०२४ मध्ये प्रक्षेपणाची चाचणी घेण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To build a space station by 2035 and by 2040 isro chief s somnath said the resolution for the next 15 years sgk
Show comments