Reel make househelp Steals Jewellery Worth Lakhs: रील्सचं वेड माणसाला कोणत्या थराला नेऊ शकतं याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. रील्स करता यावीत यासाठी डीएसएलआर कॅमेरा खरेदी करण्यासाठी दिल्लीतल्या एका बंगल्यात काम करणाऱ्या महिलेने चोरी केली आहे. नीतू यादव असं या महिलेचं नाव असून दिल्ली पोलिसांनी रविवारी तिला अटक केली. स्वत:च्या युट्यूब चॅनेलवर चांगले रील्स टाकता यावेत यासाठी तिला निकॉन कंपनीचा कॅमेरा हवा होता. यासाठी तिने लक्षावधी रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. दिल्ली पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकाने या महिलेला अटक करून दागिने ताब्यात घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द्वारका परिसरातल्या बंगला मालकाने घरात चोरी झाल्याची तक्रार १५ तारखेला पोलिसांकडे केली. सोन्याचं ब्रेसलेट, चांदीची माळ तसंच अन्य दागिने चोरीला गेल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. चोरी होण्यापूर्वी काही दिवस एक महिला घरात काम करत होती. तिच्यावर संशय असल्याचं मालकाने म्हटलं होतं.

पोलिसांनी त्या महिलेला फोन केला असता स्वीच ऑफ असं उत्तर मिळालं. तिने घरमालकाला दिलेला पत्ताही खोटा असल्याचं स्पष्ट झालं. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर तसंच परिसरातल्या अन्य लोकांशी बोलल्यावर नीतू कुठे आहे याचा पोलिसांनी शोध घेतला. एक बॅग घेऊन दिल्लीतून पळ काढत असताना पोलिसांनी तिला अटक केली.

Reel Star Aanvi Kamdar : कुंभे धबधबा येथे इन्स्टाग्रामवर रील करतांना दरीत पडून रीलस्टार अन्वी कामदारचा मृत्यू

चौकशीदरम्यान तिने राजस्थानची असल्याचं तसंच नवरा ड्रग्जच्या आहारी गेल्याचं सांगितलं. नवऱ्याच्या मारहाणीपासून सुटका करुन घेण्यासाठी दिल्लीत आल्याचं तिने सांगितलं. दिल्लीत आल्यावर उदरनिर्वाहासाठी तिने घरकाम करायला सुरुवात केली. तिने युट्यूब चॅनेल सुरू केलं आणि इन्स्टाग्रामवर रील्स टाकायलाही सुरुवात केली. चांगले व्हीडिओ करायचे असतील तर डीएसएलआर कॅमेरा घे असं तिला कुणीतरी सुचवलं. या कॅमेऱ्याची किंमत लाखात असल्याचं तिला समजलं. तिने नातेवाईकांकडे यासाठी कर्जाऊ पैसे मागितले. पण कोणीही तयार झालं नाही.

द्वारका परिसरातल्या बंगल्यात काम करत असताना घरात लाखो रुपयांचे दागिने असल्याचं तिला कळलं. हे दागिने लंपास केल्यास कॅमेऱ्यासाठी पैसे उभे राहू शकतात असा तिने विचार केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To buy dslr to make reels delhi house help steals jewellery worth lakhs psp