Actor Chiranjeevi on Gender Remark : हैदराबाद येथे चित्रपट कार्यक्रमादरम्यान केलेल्या लिंगभेदाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेता चिरंजीवी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी आता नातवाची आवश्यता असल्याचं ते म्हणाला. त्यांचं हे वक्तव्य लिंगभेदी असल्याची टीका राजकीय क्षेत्रातून होऊ लागली आहे.

ब्रह्मा आनंदमच्या प्रदर्शनापूर्वी कार्यक्रमात बोलताना चिरंजीवी म्हणाले, जेव्हा मी घरी असतो तेव्हा मला असं वाटतं की माझ्या नातवंडांमध्ये नसून महिलांच्या वसतिगृहात आहे. त्यांचा मी वॉर्डन असल्यासारखं मला वाटतं. संपूर्ण घर महिलांनी वेढलेलं असतं. मी किमान यावेळी तरी राम चरणला मुलगा व्हावा अशी आशा करतो. जेणेकरून आमचा वारसा पुढे चालू राहील. मला भीती वाटते की त्याला पुन्हा मुलगी होईल. पण त्याला सुंदर मुली आहेत.

चिरंजीवी यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र संपात व्यक्त केला जातोय. राजकारणी आणि कार्यकर्त्यांनी पितृसत्ताक संस्कृतीला यामुळे बळकटी मिळत असल्याचं म्हटलं जातंय. काँग्रेस खासदार माथेर यांनी या विधानावर टीका करताना म्हटलं की, हे खूप दुःखद आहे. हे एक अतिशय दुर्दैवी विधान आहे की फक्त एक मुलगाच हा वारसा पुढे नेऊ शकत. मुले आणि मुली दोघेही आपली संपत्ती आहेत. आम्हाला दोघांचा अभिमान आहे. आपण खरोखरच त्यांच्याकडून चांगले वर्तन करणारे व्यक्ती असावे अशी अपेक्षा केली पाहिजे जे समाजासाठी चांगलं काम करतात.”

Story img Loader