एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील आव्हान आणि चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सने एकत्र यावे असे आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रोन यांनी बुधवारी केले. चीनचे आव्हान लक्षात घेता भारत, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सची रणनितीक आघाडी उभी राहणे आवश्यक असल्याचे मत मॅक्रोन यांनी व्यक्त केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या मॅक्रोन यांचा संरक्षण सहकार्य संबंध अधिक मजबूत करण्यावर भर आहे.

फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामध्ये ३८ अब्ज डॉलरचा करार झाला असून या करारातंर्गत फ्रान्स ऑस्ट्रेलियाला पाणबुडया देणार आहे. समविचारी लोकशाही देशांमध्ये संबंध अधिक दृढ झाले पाहिजेत असे मॅक्रोन म्हणाले. समान भागीदार म्हणून चीनने आपला आदर करावा असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला संघटित झाले पाहिजे असे मॅक्रोन ऑस्ट्रेलियन नौदल तळावर भाषण करताना म्हणाले.
जानेवारी महिन्यात मॅक्रोन चीन दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी तुमचा सिल्क रोडचा प्रकल्प फक्त एकतर्फी असता कामा नये असे चीनला बजावले होते. त्यानंतर मार्च महिन्यात मॅक्रोन भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षणासह अनेक महत्वाचे करार झाले.

ऑस्ट्रेलियन दौयऱ्यात मॅक्रोन यांच्याकडून झाली छोटीशी चूक
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रोन पत्रकारपरिषदेत अपघाताने ऑस्ट्रेलियन पंतप्रधान मालकोल्म टर्नबुल यांची पत्नी ल्युसीला डिलिशियस म्हणाले. मॅक्रोन यांच्या तोंडातून चुकून निघालेल्या या शब्दांचा सोशल मीडियाने चांगलाच समाचार घेतला. मॅक्रोन यांच्या या विधानावर सोशल मीडियावर लगेचच गंमीतीशीर प्रतिक्रिया उमटल्या.
फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. पत्रकारपरिषद संपवताना आभार प्रदर्शन सुरु असताना हा गंमतीशीर प्रसंग घडला. डिलिशियस म्हणजे चवदार. एखादा पदार्थ आवडल्यानंतर कौतुकाने आपण डिलिशियस म्हणतो.

Story img Loader