खगोलप्रेमींसाठी बुधवार पर्वणीचा ठरणार आहे. नवीन वर्षांच्या आरंभी आपली पृथ्वी सूर्याच्या अत्यंत जवळून जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी पृथ्वी सूर्यापासून सर्वात जवळ म्हणजे १४ कोटी ७० लाख कि.मी. एवढय़ा अंतरावर असणार आहे, अशी माहिती प्लॅनेटरी सोसायटी ऑफ इंडियाचे सरचिटणीस एन्. घुनंदन कुमार यांनी दिली.
दरवर्षी जानेवारी महिन्यात पृथ्वी अप सूर्यस्थितीत असते, ज्यामुळे ती सूर्यापासून सर्वात कमी अंतरावर असते तर प्रतिवर्षी जुलै महिन्यात ती उप सूर्यस्थितीत असते, ज्यामुळे ती सूर्यापासून सर्वात जास्त अंतरावर असते. या वर्षी पृथ्वी आणि सूर्य ५ जुलै रोजी परस्परांपासून सर्वाधिक अंतरावर असतील.

Story img Loader