देशात पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत असल्याचं दिसून आलं आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलनं इतिहासात पहिल्यांदाच शंभरीपार मजल मारली आहे. त्यामुळे ऐन करोनाच्या संकटकाळात आर्थिक पेच निर्माण झालेला असताना सर्वसामान्यांना पेट्रोल दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागत आहे. एकीकडे पेट्रोल दरवाढीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारे कुणाचे कर जास्त? यावरून एकमेकांकडे टोलवाटोलवी करत असताना सर्वसामान्य जनता मात्र हा अतिरिक्त आर्थिक भार सहन करत आहे. शनिवारी १० जुलै रोजी देखील वाढलेल्या पेट्रोलच्या किंमतींमुळे हा भार अजूनच वाढला आहे.

काय आहेत आजच्या किंमती?

देशातील प्रमुख शहरांमध्ये वाढलेल्या किंमतींची आकडेवारी एएनआयनं दिलेली आहे. त्यानुसार, दिल्लीमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनुक्रमे १००.९१ रुपये आणि ८९.८८ रुपये इतक्या झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत देखील पेट्रोल शंभरीपार असून प्रतिलिटर १०६ रुपये ९३ पैसे तर डिझेल प्रतिलिटर ९७ रुपये ४६ पैसे इतकी किंमत झाली आहे. दुसरीकडे कोलकात्यामध्ये हेच दर अनुक्रमे १०१.०१ रुपये आणि ९२.९७ रुपये तर भोपाळमध्ये ते १०९.२४ रुपये आणि ९८.६७ रुपये इतके नोंदवण्यात आले आहेत.

शहरनिहाय पेट्रोल-डिझेलच्या किंमती!

दिल्ली – पेट्रोल १००.९१ रुपये आणि डिझेल ८९.९८ रुपये प्रतिलिटर
मुंबई – पेट्रोल १०६.९२ रुपये आणि डिझेल ९७.४६ रुपये प्रतिलिटर
चेन्नई – पेट्रोल १०१.६७ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रतिलिटर
कोलकाता – पेट्रोल १०१.०१ रुपये आणि डिझेल ९२.९७ रुपये प्रतिलिटर
बंगळुरू – पेट्रोल १०४.२९ रुपये आणि डिझेल ९५.२६ रुपये प्रतिलिटर
लखनऊ – पेट्रोल ९८.०१ रुपये आणि डिझेल ९०.२७ रुपये प्रतिलिटर
पटना – पेट्रोल १०३.१८ रुपये आणि डिझेल ९५.४६ रुपये प्रतिलिटर
भोपाळ – पेट्रोल १०९.२४ रुपये आणि डिझेल ९८.६७ रुपये प्रतिलिटर

 

अजित पवार म्हणतात, “याला केंद्र सरकार जबाबदार”!

दरम्यान, राज्यातील पेट्रोल दरवाढीविषयी अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी देखी केंद्राकडेच बोट दाखवलं आहे. “महाविकासआघाडी सरकार येण्याआधी फडणवीसांचं सरकार होतं. तेव्हा जो दर पेट्रोल, डिझेलचा होता त्यात पहिल्या आणि दुसऱ्या अर्थसंकल्पात मी वाढवलेलं नाही. जे टॅक्स आहेत, ते त्यांच्याच काळातले आहेत. केंद्र सरकार त्यात मोठी रक्कम घेत आहे. साडेतीन ते ४ लाख कोटी रुपये केंद्र सरकार घेत आहे. केंद्रानं मोठेपणा दाखवावा आणि हे दर कमी करावेत”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Story img Loader