गेल्या काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. मात्र, या तणावादरम्यान रशियाने भारतीय माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे, रशियाच्या युक्रेनसोबतच्या तणावाबाबत भारतीय माध्यमांनी वार्तांकन केल्याने मॉस्को नाराज आहे. तसेच भारतीय माध्यमांनी कझाकस्तान आणि युक्रेनबाबत पूर्ण सत्य सांगितलेले नाही, असे त्यांचे मत आहे.

रशियाने सीमेवर सुमारे ९० हजार सैनिक तैनात केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. त्याचवेळी, रशिया युक्रेनवर कधीही आक्रमण करू शकतो, असेही अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात म्हटले आहे. रशियाने २०१४ मध्ये क्रिमियावर लष्करी कारवाई करून युक्रेनच्या सीमावर्ती भागावर ताबा मिळवल्यानंतर अमेरिकेच्या या दाव्यालाही बळ मिळाले आहे होते.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Raj Thackeray Election
Raj Thackeray : राज ठाकरे निवडणूक का लढवत नाहीत? बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा ‘तो’ प्रसंग आठवत म्हणाले…
Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Nagpur,
काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका
Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”

त्यानंतर भारतातील रशियाच्या दूतावासाने यासंदर्भात सविस्तर निवेदन जारी केले आहे. निवेदनात कोणत्याही विशिष्ट माध्यमांचे वृत्त किंवा माध्यम संस्थांचा उल्लेख नसला तरी, असा दावा करण्यात आला आहे की भारतीय माध्यमांमध्ये युक्रेन आणि रशियाबद्दलच्या वृत्तांत चुकीचे चित्र दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून, रशियन दूतावासाने ट्विट करत याबद्दल भाष्य केले आहे. “आम्ही खेद व्यक्त करत आहोत की काही भारतीय माध्यमांमधून पुन्हा एकदा युक्रेनच्या अंतर्गत संकटातील परिस्थितीचे चुकीचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या प्रकरणी रशियाची भूमिका उलट असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याउलट, युक्रेनियन अधिकार्‍यांनी केलेल्या अपमानजनक विधानांच्या प्रसारासह आम्ही समजतो की या एकतर्फी अहवालांचा भारत सरकारच्या अधिकृत वक्तव्यांशी काहीही संबंध नाही. आम्हाला काही मुद्द्यांवर आमची भूमिका स्पष्ट करायची आहे,” असे रशियन दूतावासाने म्हटले आहे.

दरम्यान, याआधी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि आर्थिक आघाडीवर अनेक दुष्परिणाम सहन करावे लागतील, असा इशारा आपण रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना दिल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पत्रकारांना दिली होती.

जी-७ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लिव्हरपूलमधील बैठकीनंतर रशियाने वाटाघाटींद्वारे युक्रेनशी असलेले मतभेद संपवावेत, असे त्यांनी म्हटले आहे. आक्रमण केल्यास घातक परिणाम होतील, असे त्यांनी रशियाला बजावले होते.