देशातील राष्ट्रीय महामार्गांवर २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य महामार्गावर टोलमाफीला मुदतवाढ दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली आहे. राज्यातील सर्व राज्य महामार्गावर २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्यात आली आहे.
तत्पूर्वी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफीची घोषणा केली होती. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर टोलनाक्यांवर कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी यापूर्वी ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्यात आली होती. त्यानंतर १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु चलन समस्या सुटत नसल्यामुळे पुन्हा १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवली होती. त्यात बदल करत आता पुन्हा २४ नोव्हेंबरपर्यंत टोलमाफीचा कालावधी वाढवला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा