Top 10 richest people in India as of January 2025 : भारताचे आंतरराष्ट्रीय बाजारातील वजन गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारतातील उद्योजक देशाच्या आर्थिक वाढीसाठी मोठं योगदान देत आहेत, ज्यामुळे २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी-सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल.
देशात अब्जाधिशांची संख्येत विक्रमी वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतीमा चांगलीच उंचावली आहे. देशात सध्या २१७ अब्जाधीश आहेत ज्यापैकी ८४ जणांची या यादीत नव्याने भर पडली आहे. यामुळे भारत हा सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
मुंबईचा जगभरात डंका
Henley & Partners च्या गेल्या वर्षीच्या रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये जगातील टॉप ५० श्रीमंत शहरांमध्ये मुंबई आणि दिल्ली अनुक्रमे २४ व्या आणि ३७ व्या स्थानावर होते. यातूनच हे भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या वाढती संख्या पुन्हा एकदा अधोरेखीत होते.
विशेष म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबईने बिजींगला मागे टाकत बिलीनियर्स कॅपिटल ऑफ अशियाचा मान पटकावला आहे. यासह मुंबई सर्वात वेगाने वाढत असलेलं ‘बिलेनियर्स हब’ ठरत आहे. याबरोबरच हुरुन(Hurun) च्या रिपोर्टनुसार मुंबई जगातील तिसरे सर्वात श्रीमंत शहर बनले आहे.
२०१४ मध्ये, भारतातील १०० अब्जाधीशांची एकूण संपत्ती गेल्या वर्षीच्या शेअर बाजारातील तेजीमुळे ३००अब्ज डॉलरहून अधिकने वाढून १.१ ट्रिलियन डॉलरवर पोहचली. यातच आता नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच फोर्ब्सने जानेवारी २०२५ पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जारी केली आहे. या यादीतील भारतीयांची नावे आज आपण पाहाणार आहोत.
मुकेश अंबानींचा पहिला क्रमांक
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे यादीतील पहिले भारतीय ठरले आहेत. तर जागतिक क्रमवारीत त्यांचा १८ वा क्रमांक लागतो. नुकत्याच आलेल्या आर्थिक अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी उत्पन्नाच्या बाबतीत भारतातील सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी ठरली आहे.
तर भारतीय महिला अब्जाधीशांच्या यादीत सावित्री जिंदाल आणि फॅमिली यांचा देशातील सर्वात श्रीमंत महिला असल्याचे जाहीर करण्यातआले आहे. त्यांची संपत्ती ३८.५ अब्ज डॉलर इतकी आहे. तर डी मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमाणी हे ३१.५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह २०२५ मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक ठरले आहेत.
फोर्ब्स अब्जाधीशांच्या ताज्या यादीनुसार, २०२५ मधील टॉप १० श्रीमंत भारतीय आणि त्यांची जागतिक क्रमवारी
भारतीतील रँक | जागतिक रँक | नाव | नेट वर्थ (USD) | संपत्तीचा स्रोत |
१ | १८ | मुकेश अंबानी | ९५.४ अब्ज डॉलर | रिलायन्स इंडस्ट्रीज |
२ | २५ | गौतम अदानी | ६२.३ अब्ज डॉलर | अदाणी समूह |
३ | ३७ | शिव नाडर | ४२.१ अब्ज डॉलर | एचसीएल एंटरप्राइझ |
४ | ४१ | सावित्री जिंदाल आणि फॅमिली | ३८.५ अब्ज डॉलर | ओपी जिंदाल ग्रुप |
५ | ५९ | दिलीप संघवी | २९.८ अब्ज डॉलर | सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज |
६ | ८९ | सायरस पूनावाला | २२.२ अब्ज डॉलर | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया |
७ | ९२ | कुमार बिर्ला | २१.४ अब्ज डॉलर | आदित्य बिर्ला ग्रुप |
८ | १०६ | कुशल पाल सिंग | १८.१ अब्ज डॉलर | डीएलएफ लिमिटेड |
९ | १०८ | रवी जयपुरिया | १७.९ अब्ज डॉलर | वरुण बेव्हरेजेस |
१० | १२९ | राधाकिशन दमाणी | १५.८ अब्ज डॉलर | डी मार्ट |
टीप : शेअर्सच्या किमती या कमी जास्त होत असतात त्यामुळे एकूण उत्पन्न कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे वरती देण्यात आलेल्या संपत्तीचा आकडा ०२ जानेवारी २०२५ पर्यंतचा आहे.