संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात दलित पँथर-भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
शिवप्रतिष्ठान संस्थेचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या कार्यक्रमादरम्यान दलित पँथर आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. हा प्रकार मुंबईतील शिवडी येथे घडला. या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली…वाचा सविस्तर
‘मनुस्मृती’ जाळणे समानतेसाठी महत्त्वाचे
‘मनुस्मृती’त महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता. ब्राह्मण समाजातील महिलाही शिक्षण घेऊ शकत नव्हत्या. या समाजातील केवळ पुरुषांना शिक्षणाचा अधिकार होता. इतर कुणी शिक्षणाविषयी काही ऐकत असल्यास त्यांनाही कडक शासन होते. या सर्वाचा उल्लेख ‘मनुस्मृती’त करण्यात आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ जाळली, असे ठाम मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी माळी समाज संमेलनात व्यक्त केले….वाचा सविस्तर
Rafale Deal : क्वात्रोची मामा, मिशेल अंकल नसल्यामुळेच काँग्रेसकडून आदळआपट – मोदी
राफेल विमान खरेदीवरून सुरू असलेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मौन सोडले. भाजप सरकारमध्ये क्वात्रोची मामा आणि ख्रिश्चियन अंकल नसल्यामुळेच काँग्रेस आंदेलेन आणि खोटं बोलून भाजप सरकारच्या संरक्षण खरेदीवर आदळआपट करीत आहे. आता तर काँग्रेस न्यायालयावरही अविश्वास दाखवत आहे, असा हल्लाबोल मोदी यांनी सोनिया गांधी यांचा मतदार संघ असलेल्या रायबरेलीतून केला….वाचा सविस्तर
राहुल गांधींनी पप्पू नाही, पप्पा होण्याची गरज – रामदास आठवले
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आता पप्पा होण्याची गरज आहे असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. रामदास आठवले नेहमीच आपल्या अनोख्या शैलीतील वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. यावेळी त्यांनी राहुल गांधींना सल्ला देताना आता ते पप्पू राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी आता पप्पा होण्याची गरज आहे असं वक्तव्य केलं आहे.…वाचा सविस्तर
‘बिग बी’ का झाले वाढपी, अभिषेकने दिलं उत्तर
चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या दोन्ही दिग्गज कलाकारांनी इशाच्या लग्नात चक्क जेवणाच्या पंगतीमध्ये वाढप्याची भूमिका पार पाडली. त्यांचा हा व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र या दोघांनीही लग्नात पाहुणे म्हणून हजर न राहता एका वाढप्याचं काम का केलं याचा खुलासा अभिनेता अभिषेक बच्चन याने केला आहे.…वाचा सविस्तर