मराठा समाज ‘ओबीसी’च!

मराठा आणि कुणबी या स्वतंत्र दोन नव्हे, तर एकच जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला ‘इतर मागासवर्ग जातीं’मध्ये (ओबीसी) समाविष्ट करायला हवे, असे ठाम मत ‘राज्य मागासवर्ग आयोगा’ने आपल्या अहवालात मांडले आहे. मराठा आणि कुणबी ही एकच जात असतानाही मराठा समाजाला इतर मागासवर्ग जातींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे हा समाज कित्येक दशके आरक्षण आणि त्याच्या लाभांपासून वंचित असून त्याने खूप सोसले आहे. त्यामुळे हा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास असून आता तरी त्याला अन्य मागासवर्ग जातींत समाविष्ट करून त्याचे लाभ द्यावेत, असेही आयोगाने मराठा समाजाला आरक्षणाची शिफारस करताना नमूद केले आहे. वाचा सविस्तर  

अग्रलेख :  रोमँटिक आणि रसरशीत
आयुष्यभर दहा ते पाच नोकरी करून सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या पापभीरूंना बंडखोरांचे नेहमीच आकर्षण असते. जागतिक पातळीवर असा सर्वाना आकर्षून घेणारा बंडखोर म्हणजे चे गव्हेरा. भारतात तो मान निर्वविाद जॉर्ज फर्नाडिस यांचा. तसे पाहू गेल्यास कागदोपत्री जॉर्ज यांची ओळख एक कामगार नेता इतकीच. पण ते तितके कधीच नव्हते. किंबहुना कोणा एकाच ओळखीत मावणे हा जॉर्ज यांचा स्वभावच नव्हता. मूळचे मंगलोरी ख्रिश्चन, निवडणूक लढवली मुंबई आणि बिहारातून, कार्यस्थल मुंबई आणि समस्त भारत, या प्रवासात संवाद साधला तुळू, मंगलोरी कोंकणी, मराठी, हिंदी आणि अस्खलित इंग्रजीतून आणि कोणाशी? तर जेआरडी टाटा ते रस्त्यावरचा मुंबई महापालिकेचा सफाई कामगार ते संपादक ते लेखक/ कवी अशा अनेकांशी. अशा सर्वव्यापी, सर्वसंचारी व्यक्तिमत्त्वांची पदास अलीकडच्या काळात थांबलेली आहे. त्यामुळे माणसे अशीही असू असतात यावर गेल्या दीड-दोन दशकांचे राजकारण अनुभवणाऱ्या पिढीचा विश्वास बसणे अंमळ अवघड. म्हणून जॉर्ज फर्नाडिस यांचे मोठेपण समजून सांगणे ही काळाची गरज ठरते. वाचा सविस्तर 

जॉर्ज फर्नांडिस

 

‘भाई’ चित्रपटात हिराबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे चारित्र्यहनन
‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटामध्ये ज्येष्ठ गायिका गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चारित्र्यहनन करणारे चित्रीकरण करण्यात आले आहे, अशा शब्दांत किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी चित्रपटावर टीका केली आहे. हिराबाई बडोदेकर या भीमसेनजी, वसंतराव देशपांडे आणि पु. ल. देशपांडे यांच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठय़ा होत्या. त्या या सगळ्यांना मातृस्थानी आणि गुरुस्थानीच होत्या. हिराबाईंचे घर सर्वासाठी स्वरमंदिर होते. अत्रे यांनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले आहे. वाचा सविस्तर 

‘भाई : व्यक्ती की वल्ली’

 

दुमडता येणारी तीनचाकी, १० हजारांचा लॅपटॉप..

अवघ्या दहा हजार रुपयांचा लॅपटॉप, दुमडून ठेवता येणारी ट्राइक अशी संशोधन, कलात्मकतेतून साकारलेली उपकरणे पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. ‘शिकण्या-शिकवण्याच्या नवकल्पना’ या संकल्पनेवर आधारित असलेला ‘इनोव्हेशन’ महोत्सव २ ते ४ फेब्रुवारी या काळात नेहरू विज्ञान केंद्रात भरवण्यात येणार आहे. वाचा सविस्तर 

(संग्रहित छायाचित्र)

प्रसिद्ध गायिका शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू, पतीची प्रकृती नाजूक

प्रसिद्ध गायिका शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी पती निखील भाटियासोबत नोएडाहून आग्र्याला जात होती. यावेळी यमुना एक्स्प्रेस-वेवर त्यांच्या कारचा अपघात झाला.

अपघातात निखील भाटिया गंभीर जखमी आहे. निखील भाटिया रुग्णालयात दाखल असून प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. वाचा सविस्तर 

 

Story img Loader