१. कलम 370 हटवून भारताने पाकिस्तानचा कोथळा बाहेर काढला : शिवसेना
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. एकीकडे भारतासोबतचा व्यापार पाकिस्तानने बंद केला. तर दुसरीकडे समझोता एक्स्प्रेस असेल किंवा भारतीय चित्रपटांवरील बंदी असेल असे अनेक निर्णय पाकिस्तानने घेतले. वाचा सविस्तर :
२.सांगली-कोल्हापुरकरांच्या अडचणी वाढणार, हवामान विभागाकडून आजही अतिवृष्टीची शक्यता
एकीकडे पूरपरिस्थितीचा सामना सुरू असतानाच सांगली, कोल्हापूर आणि पुण्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या ठिकाणी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर :
३. …कायम तुमच्या सोबत आहोत, सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मराठी कलाकार सरसावले
आठवड्याभरापासून सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. या साऱ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आणि अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यातच आता मराठी कलाकारही या पूरग्रस्तांसाठी पुढे सरसावले आहेत. वाचा सविस्तर :
४.कुस्तीपटू बजरंग पुनिया विवाहबंधनात अडकणार
जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया विवाहबंधनात अडकणार आहे. महिला कुस्तीमध्ये भारताचं नाव जागतिक पातळीवर नेणाऱ्या फोगट भगिनींपैकी संगिता फोगटशी बजरंगचं लग्न ठरलं आहे. दोन्ही परिवारांमधल्या लोकांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. वाचा सविस्तर :
५.पूरबळी प्रशासनाच्या बेपर्वाईमुळेच!
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांतील पूरस्थिती हातळण्यात शासकीय यंत्रणा पर्णपूणे अपयशी ठरली आहे, प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे ११ निरपराधांचे बळी गेले, अशा शब्दात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली. पूरपरिस्थिती राज्य प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे, ती सावरण्यासाठी तातडीने लष्कराला पाचारण करावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. वाचा सविस्तर :