१. Pulwama Terror Attack: ‘अत्यंत भयानक’, पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अत्यंत भयानक परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण यासंबंधीचे सर्व रिपोर्ट्स तपासत असून याप्रकरणी लवकरच एक स्टेटमेंट जारी करणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. वाचा सविस्तर :

२. धोनीच्या हाताखाली खेळणं मोठी गोष्ट – युजवेंद्र चहल
युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीने गेल्या वर्षभराच्या कालावधीत टीम इंडियामध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. दोन्ही फिरकीपटूंनी धोनीच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कामगिरीतही सुधारणा केली आहे. धोनीच्या हाताखाली खेळणं ही आपल्यासाठी मोठी गोष्ट असल्याचं, चहलने मान्य केलं आहे. तो हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. वाचा सविस्तर :

३.पैसे घेऊन निवडणूक प्रचार करण्यासंदर्भात सनी लिओनी, सोनू सुद म्हणतात…
लोकसभेच्या निवडणुका मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील. या निवडणुकांच्या प्रचारासाठी बॉलिवूडमधील काही कलाकारांनी पैसे घेऊन प्रचार करणार असल्याचा दावा ‘कोब्रा पोस्ट’ने केला. ३० पेक्षा जास्त कलाकार पैसे घेऊन प्रचार करण्यास तयार असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वाचा सविस्तर :

४.‘ई चलन’चा जोर वाढणार!
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईचा जोर वाढवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बेशिस्त वाहनचालकांना रोखविरहीत दंड आकारण्यासाठी वापरली जाणारी ई-चलन यंत्रे आता स्थानिक पोलिसांना पुरवण्यात येणार आहेत. वाचा सविस्तर :

५. ‘झोपु’तील १३ हजार घुसखोर अधिकृत?
मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या पुनर्वसन योजनेला गती देण्यास यश आलेले नसतानाच आता या योजनांतील १३ हजार घुसखोरांना अधिकृत करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास झोपु योजनेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाणार आहे. वाचा सविस्तर :

Story img Loader