१. गिरीश महाजनांसारख्या आरतीबाज लोकांपासून सावध राहा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी रस्त्यावर आहे व दैवी चमत्कार संचारलेले मुख्यमंत्री असतानाही बेळगावसह सीमा भागात मराठी माणूस चिरडला जात आहे. दैवी चमत्कारच आता सीमा प्रश्न सोडवू शकेल व ती ‘पॉवर’ आज फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे! गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे–धुपारे उडवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनवाले नरेंद्र दाभोलकर यांचा आत्माही आता सांगत असेल, माझे खुनी पकडू नका! मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून दिला आहे. वाचा सविस्तर :
२. संतापजनक ! महाराष्ट्रातील कुस्तीपटूंवर टॉयलेटजवळ बसून प्रवास करण्याची वेळ
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील कुस्तीपटूंना रेल्वे प्रवासात टॉयलेटजवळ बसून प्रवास करावा लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सर्व कुस्तीपटू अयोध्येतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून परतत असताना हा प्रकार घडला आहे. परतत असताना सर्व कुस्तीपटूंना अनारक्षित डब्यातून प्रवास करावा लागला. पण त्यातही जागा नसल्याने अखेर शौचालयाजवळ बसून २५ तासांचा रेल्वे प्रवास करण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली. वाचा सविस्तर :
३. हरमनप्रीत, स्मृतीचा रमेश पोवारला पाठिंबा, महिला भारतीय क्रिकेट संघात फूट
गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेट संघातील मानपाननाट्य चांगलंच गाजलं आहे. भारतीय महिला संघाची वरिष्ठ क्रिकेटपटू मिताली राज व प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वाद जाहीर झाल्याने संघाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत होती. दोघांपुरतं मर्यादित राहिलेलं हे भांडण आता संघात फूट पाडू लागलं असल्याचं दिसत आहे. कारण टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी रमेश पोवारला पाठिंबा दर्शवत त्यांना पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी नेमण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर :
४. महिंद राजपक्षे यांना पंतप्रधान म्हणून काम करण्यास न्यायालयाची मनाई
श्रीलंकेतील एका न्यायालयाने सोमवारी महिंद राजपक्षे यांना देशाचे पंतप्रधान म्हणून काम करण्यास मनाई केली. यामुळे रानिल विक्रमसिंघे यांच्या जागेवर राजपक्षे यांना नेमण्याचा वादग्रस्त निर्णय घेणाऱ्या अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांना मोठा धक्का बसला आहे. वाचा सविस्तर :
५. हवामान बदल रोखण्यासाठी वेळीच प्रयत्नांची गरज
हवामान बदल रोखण्यासाठी सध्या होत असलेले प्रयत्न अतिशय तोकडे असून या समस्येचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा वेळ निघून गेलेली असेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी हवामान परिषदेच्या उदघाटनप्रसंगी दिला. अलिकडच्या काळातील टोकाच्या हवामान घटनांवर चिंता व्यक्त करतानाच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले. वाचा सविस्तर :