१. महाराष्ट्रात ही कसल्या अपशकुनाची सुरुवात ? : शिवसेना
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पायाभरणीदरम्यान झालेल्या बोट अपघातावरुन शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडले. शिवस्मारक व्हावे, पण बुडालेल्या बोटीबरोबर स्मारकाचे राजकारणही कायमचे बुडावे. पायाभरणीचा कार्यक्रम रद्द झाला. महाराष्ट्रात ही कसल्या अपशकुनाची सुरुवात म्हणायची?, असे शिवसेनेने म्हटले आहे. वाचा सविस्तर :
२. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या कार्यालयावर ‘ईडी’चा छापा
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या बेंगळुरुतील कार्यालयावर गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला असून परकीय देणगी नियम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. वाचा सविस्तर :
३. बॉम्बे रिपब्लिकन्स हॉकीचे विद्यापीठ
काही माणसे जिद्दीनं, वेडानं झपाटलेली असतात. काहीतरी करून दाखविण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नाही. हॉकी प्रशिक्षक मर्झबान पटेल ऊर्फ ‘बावा’ हे त्यापैकीच एक नाव. दुपारचे चार वाजले की मुंबई हॉकी असोसिएशनच्या अॅस्ट्रोटर्फवर किंवा स्टेडियमसमोरच्या मातीवर दररोज लहान मुलांना प्रशिक्षण देणारी एक व्यक्ती दिसून येते. गेली चार दशके अविरतपणे हे अभियान सुरू आहे. हॉकी स्टिक आणि चांगले शूज घेण्याची कुवत नसलेल्या तळागाळातल्या, गरीब घरातून आलेल्या मुलांना थेट ऑलिम्पिकचं स्वप्न दाखविणारं आणि ते पूर्ण करून दाखवणारं हॉकीचं विद्यापीठ म्हणजे मर्झबान पटेल. वाचा सविस्तर :
४. ‘हाऊसफूल ४’ पुन्हा अडचणीत, सेटवर महिला ज्युनिअर आर्टिस्टचा विनयभंग
अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपामुळे आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या ‘हाऊसफूल ४’ चित्रपटामागचं शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाही. #MeToo मोहिमेमुळे आधी नाना पाटेकर आणि नंतर दिग्दर्शक साजिद खान यांना चित्रपट सोडावा लागल्याने चर्चेत आलेल्या हाऊसफूल ४ चित्रपटाच्या सेटवर अजून एका महिलेने गैरवर्तवणूक झाल्याचा आरोप केला आहे. एका महिला ज्युनिअर आर्टिस्टने सेटवर आपला विनयभंग झाल्याचा आरोप केला आहे. वाचा सविस्तर :
५. माहिती संरक्षण कायद्याच्या उल्लंघनासाठी ब्रिटनमध्ये फेसबुकला ५ लाख पौंडांचा दंड
माहिती संरक्षण कायद्याचे (डेटा प्रोटेक्शन लॉ) गंभीर उल्लंघन केल्याबद्दल ब्रिटनच्या इन्फॉर्मेशन कमिशनर कार्यालयाने (आयसीओ) फेसबुकला तब्बल ५ लाख पौंडांचा दंड ठोठावला. कायद्यानुसार या कार्यालयाला एवढय़ा कमाल रकमेचा दंड ठोठावण्याचा अधिकार आहे. वाचा सविस्तर :