१. रामभक्त म्हणून जे सत्तेवर आले त्यांचा कुंभकर्ण झाला – उद्धव ठाकरे
शिवसेना पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्यावर आक्रमक झाली आहे. शिवसेनेने चलो अयोध्येचा नारा दिल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजपाला टोले लगावले आहेत.
वाचा सविस्तर :
२. हरमनप्रीत कारस्थानी – मिताली राजच्या मॅनेजरचा आरोप
महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यातून मिताली राजला संघातून वगळण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला होता. या निर्णयावरुन आता वाद निर्माण झाला आहे. मिताली राजची मॅनेजर अनिशा गुप्ताने अत्यंत कठोर शब्दात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर टीका केली आहे. इंग्लंडकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय महिला संघाचे टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. वाचा सविस्तर :
३.शीख भाविक, अधिकारी यांना प्रवेश नाकारल्याने पाकिस्तानचा निषेध
भारतीय उच्चायुक्तालयाचे इस्लामाबादेतील अधिकारी व नानकानासाहिब गुरूद्वाराला भेट देण्यासाठी आलेले यात्रेकरू यांना प्रवेश नाकारून छळ केल्याच्या प्रकरणी भारताने तीव्र चिंता व्यक्त केली असून या मुद्दय़ावर भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध भारताने तीव्र निषेध नोंदवल्याने आणखी खालावले आहेत. वाचा सविस्तर :
४. भुयारी मार्ग पाहिजे तर जमीन द्या
‘वडाळा ते जनरल पोस्ट ऑफिस’ (जीपीओ) या मेट्रो -४ च्या विस्तारित मार्गिकेमधील ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या (बीपीटी) जमिनीवरून जाणारी मार्गिका भुयारी करण्याची मागणी पोर्ट ट्रस्टने ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’कडे (एमएमआरडीए) केली होती. त्यावर भुयारी मार्गिकेला लागणारा संपूर्ण बांधकाम खर्च पोर्ट ट्रस्टने द्यावा, अशी भूमिका ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने घेतली आहे. वाचा सविस्तर :
५. दीड वर्षांनंतरही रस्त्यांवरील ‘पेव्हरब्लॉक’ कायमच
रस्त्यांवरील अपघातांना कारणीभूत ठरणारे पेव्हर ब्लॉक त्वरित काढून त्या ठिकाणच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या आयुक्तांनी दीड वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशाला हरताळ फासला गेल्याने मुंबईत ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉक ‘जैसे थे’च आहेत. पेव्हर ब्लॉक काढण्यात झालेली ही दिरंगाईच दादर पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील अपघाताला कारणीभूत ठरली आहे. वाचा सविस्तर :