Israeli agent: इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर विभागाच्या विरोधात लढण्यासाठी इराणने जो कार्यगट बनविला होता, त्या कार्यगटात मोसादचाच गुप्तहेर काम करत होता, असा गौप्यस्फोट इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी केला आहे. अहमदीनेजाद म्हणाले की, २०२१ साली इस्रायलच्या गुप्तहेर विभागाच्या विरोधात लढण्यासाठी जो कार्यगट इराणने स्थापन केला होता, त्यामध्ये बहुसंख्या इस्रायलचेच एजंट काम करत होते.

सीएनएन टर्क या वृत्तसंस्थेशी बोलताना अहमदीनेजाद म्हणाले, इस्रायलने इराणमध्ये आपले जाळे खोलवर पसरवले होते. त्यांना सर्व काही माहिती अतिशय सहज मिळत होती. इराणमध्ये मोसादविरोधात लढण्यासाठी जो गुप्तवार्ता विभाग तयार केला होता, त्याचा प्रमुखच इस्रायलचा एजंट होता. याबद्दल आजही इराणचे प्रमुख लोक काहीही बोलण्यास तयार नाहीत.

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Bashar al-Assad
Bashar al-Assad: सीरियाचा नेता की क्रूर राजवटीचा चेहरा? बशर अल-असद कोण आहे?
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Syria, Abu Mohammad Al Jolani, dictatorship Syria,
विश्लेषण : जिहादीचा बनला प्रशासक… कोण आहे सीरियाचा नवा शासक अबू मोहम्मद अल जोलानी?
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?
Prime Minister announces free elections in Syria
सीरियात असादपर्वाची अखेर सत्ता उलथवण्यात बंडखोरांना यश; पंतप्रधानांची मुक्त निवडणुकांची घोषणा

हे वाचा >> Pakistani family in India: पाकिस्तानी कुटुंबानं ‘शर्मा’ नाव लावून बंगळुरूत केलं वास्तव्य; ‘असं’ फुटलं बिंग

फक्त गुप्तवार्ता विभागाचा प्रमुखच नाही तर इराणच्या संपूर्ण गुप्तहेर खात्यामध्येच इस्रायलचे २० एजंट काम करत होते, असेही अहमदीनेजाद यांनी सांगितले. एवढेच नाही तर इराणच्या अन्वस्त्र कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती इस्रायलला मिळाली होती. तसेच २०१८ साली इराणच्या अन्वस्त्र कार्यक्रमाचे दस्ताऐवजही चोरण्यात आले होते आणि काही इराणी शास्त्रज्ञांची हत्या करण्यात आली होती.

नुकतेच इराणमध्ये हेझबोलाचा प्रमुख नेता हसन नसरल्लाहचा इस्रायलच्या मृत्यू झाला होता. बेरुतमधील मुख्यालयात हसन नसरल्लाह आहे, याबाबतची माहिती इराणी गुप्तहेरांकडून इस्रायलला देण्यात आली होती, अशी माहिती बाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. अहमदीनेजाद यांच्या आरोपानंतर आता विद्यमान राज्यकर्त्यांविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. गुप्तचर विभागाचे माजी मंत्री अली युनीसी यांनीही दावा केला की, इस्लामिक देश असूनही इस्रायलने त्यांचे अनेक माणसे विविध विभागात पेरली आहेत.

हे ही वाचा >> Thailand Bus Fire: धक्कादायक! थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग लागून २५ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

युनीसी यांनी २०२१ साली एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, मागच्या १० वर्षात मोसादने अनेक विभागात शिरकाव केला आहे. त्यामुळे इराणच्या सरकारी विभागातील अधिकाऱ्यांना आता त्यांच्या जीवाची भीती वाटत आहे.

२३ सप्टेंबर पासून इस्रायलने हेझबोलाच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले चढविण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे ९६० लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास २,७७० लोक जखमी झाले आहेत. अशी माहिती लेबनान आरोग्य मंत्रालयाने दिली.

Story img Loader