सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचे वारे देशातील सर्वोच्च अशा राष्ट्रपती भवनापर्यंत जाऊन पोहोचले असून, राष्ट्रपती भवनही ट्विटरवर अवतरले आहे. मंगळवारीच ट्विटरच्या व्यासपीठावर आलेल्या राष्ट्रपती भवनाला फॉलो करणाऱयांची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे.
@RashtrapatiBhvn असे राष्ट्रपती भवनाच्या ट्विटर खात्याचे नाव आहे. या खात्याचे कव्हर पेज म्हणून राष्ट्रपती भवनाचे छायाचित्र वापरण्यात आले असून, सोबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेही छायाचित्र आहे. राष्ट्रपतींच्या सचिवालयाकडून हे ट्विटर खाते वापरण्यात येणार असून, सर्व ट्विट राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतरच प्रसिद्ध करण्यात येत आहेत, असे या ट्विटर खात्याच्या प्रोफाईलमध्ये स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांचेही ट्विटरवर खाते असून, नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर सध्या ५६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Story img Loader