रशियाने तब्बल पाच दशकांनी चंद्राकडे पाठविलेले ‘लुना-२५’ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले असल्याचे रशियाची अवकाश संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ यांनी रविवारी (दि. २० ऑगस्ट) जाहीर केले. यामुळे या मोहिमेवर काम करणाऱ्या भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ यांना मॉक्सोमधील रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिपेंडंट या स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, “मिशन अयशस्वी झाल्यानंतर ९० वर्षीय मिखैल मारोव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात नेण्यात आले.”

“लुना २५ चे लॅण्डिंग अयशस्वी होणे हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. त्यामुळे माझ्या आरोग्यावर परिणाम झाला”, असं स्थानिक माध्यमांना मारोव यांनी सांगितले.

हेही वाचा >> रशियाचे लुना-२५ कोसळले; चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे इतके कठीण आहे का?

मिखैल मारोव यांनी सोव्हिएत युनियनसाठी अंतराळ मोहिमांवर काम केले आहे. तसंच, लुना २५ ही मोहिम त्यांच्यासाठी महत्त्वाची होती. चंद्रावर आम्ही उपकरण उतरवू शकलो नाही ही खेदजनक बाब आहे. या क्रॅशमागील कारणांवर चर्चा केली जाईल आणि त्यावर अभ्यास केला जाईल, असंही ते म्हणाले.

२० ऑगस्टला रात्री लुना-२५ हे यान कक्षा कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जाणार होते. यासाठी यानावरील इंजिन सुरू करत दिशा बदल करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. मात्र, इंजिनाचे प्रज्वलन झालं नसल्याची माहिती रशियाने जाहीर केली. यातच आता लुना-२५ हे यान चंद्रावर कोसळल्याची माहिती रशियन अंतराळ संस्थेने दिली.

दरम्यान, पन्नास वर्षानंतर रशिया चंद्रावर संशोधन करत आहे. रशियाने १० ऑगस्ट १९७६ साली लुना-२५ हे यान पाठवलं होतं. पाच दशकाच्या कालावधीनंतर प्रथमच लुना-२५ हे यान पाठवण्यात आलं. पण, रशियाच्या चांद्रयान मोहिमेला अपयश आलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top russian scientist hospitalised hours after luna 25 moon mission crash sgk