Goa Tourism : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातून अनेक जण गोव्यात जातात. मात्र यंदा ऐन सणासुदीच्या काळात पर्यटकांची संख्या कमी झाल्याने व्यवसाय मंदावल्याची तक्रार गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक मालकांनी केली आहे. पर्यटन विभागाने या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच तात्पुरत्या स्वरूपाच्या बीच शॅक्स उभारण्यासाठी परवाने जारी केले होते. पण किनाऱ्यावर उभारलेल्या शॅक्समध्ये राहाणाऱ्या पर्यटकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे शॅक मालकांचे म्हणणे आहे.

“ख्रिसमस हा पूर्वी बऱ्यापैकी व्यस्त काळ असायचा. यावर्षी आम्हाला जास्त पर्यटक अपेक्षित होते… गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची संख्या वाढली आहे, तरीही ती तुलनेने पूर्वीच्या संख्येच्या जवळपासही नाही”, अशी माहिती गोवा शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष क्रूझ कार्डोझो यांनी दिली.

tapti ganga Express train loksatta
ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन राजस्थानच्या दोन प्रवाशांवर हल्ला, नंदुरबार स्थानकातील घटना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Godrej Consumer shares beneficiary
ससा-कासवाची गोष्ट : ‘गोदरेज कन्झ्युमर’चा शेअर अर्थसंकल्पाचा लाभार्थी ठरेल?
ST hiked passenger fares by around 15 percent now avdel tethe Pravas pass fares also increased from 45 to 66 percent
‘एसटी’च्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेला प्रवासी मिळणार कसे?.. पासच्या किमती…
shani snan mahakumbh ticket price hike
विदेश दौऱ्यापेक्षा प्रयागराजचा विमान प्रवास महागला, तिकीटे ५०,००० पार; कारण काय? सरकार काय करणार?
eknath shinde and devendra fadanvis
सागरी किनारा मार्ग वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी लोकार्पण
paragliding in goa
Paragliding in Goa : गोव्यातील पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारने ‘या’ उपक्रमावर आणली स्थगिती!
ie thinc
IE THINC: ‘तंत्रज्ञान सुलभ आणि परवडणारे झाले पाहिजे’

“विदेशी पर्यटक आणि जास्त पैसे खर्च करणारे पर्यटक शॅकमधून गायब झाले आहेत. ओझरान बीचवर शॅकमध्ये राहत असलेल्यांची संख्या ३० टक्क्यांच्या जवळपास आहे. बहुतेक लोक थायलंड, श्रीलंका आणि व्हिएतनाम येथे जाणे पसंत करत आहेत, जे तुलनेने स्वस्त पर्यटनस्थळे आहेत. ही चिंतेची बाब आहे”, असेही कार्डोझो यांनी पुढे बोलतना सांगितले.

समुद्र किनाऱ्यावर उभारलेल्या या शॅक्स या बांबू, लाकूड अशा नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या असतात. १ सप्टेंबर ते ३१ मे पर्यंतच्या पर्यटकांच्या हंगामात सरकार गोव्यातील बेरोजगारांना समुद्रकिनाऱ्यावर या तात्पुरत्या शॅक्स उभारण्यास परवाना देते. गोव्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी या शॅक्स पूर्वी एक प्रमुख आकर्षण होते. कार्डोझो यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षांमध्ये शॅक्सना भेट देणार्‍या देशी पर्यटकांच्या संख्याही वाढली आहे.

“पण ते पैसे खर्च करणार नसतील तर काय फायदा? आमचे ग्राहक वेगळे आहेत. काही पर्यटक दुसऱ्या राज्यातून जीपमधून गोव्यात येतात. ते हॉटेल बुक करत नाहीत आणि बीचवर एक दिवस घालवतात आणि निघून जातात. आम्हाला त्यांच्याकडून फारसा व्यवसाय मिळत नाही”, असेही कार्डोझो म्हणाले.

हेही वाचा>> Jaisalmer Tubewell Water Burst Video : जैसलमेरमध्ये जमिनीतून उसळला पाण्याचा फवारा, लोकांमध्ये घबराट; सरस्वती नदीशी काही संबंध आहे का? तज्ज्ञ म्हणाले…

त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, गोवा पर्यटनासाठी २०२१ हे सर्वोत्तम वर्ष होते, त्या वर्षात कोरोना महामारीमुळे घातलेली बंधने काढण्यात येऊ लागली होती, यानंतर व्हिसा पॉलिसी आणि चांगल्या पायाभूत सुविधांमुळे प्रवासी जगातील इतर पर्यटन स्थळांकडे आकर्षित होऊ लागले. रशिया-युक्रेन आणि पश्चिम आशियातील युद्धांमुळे सुरुवातीला जगाच्या या भागात येणार्‍या परदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्याचा आरोप झाला होता, यातच सध्या थायलंड हे पर्यटकांनी भरलेले असल्याचे कार्डोझो यांनी नमूद केले.

परदेशी पर्यटकांनी गोव्याला जाणे सोडून दिले असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल सोशल मीडिया पोस्टनंतर, गोव्यातील पर्यटनासंबंधी पायाभूत सुविधांचा मुद्दा चर्चेत आला होता. अनेकांनी गोव्याला भेट दिल्यानंतर त्यांना तेथे आलेले वाईट अनुभव शेअर केले होते. तर काहींनी दावा केला होता की लोक आता गोव्याऐवजी, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम सारख्या पर्यटनस्थळांकडे वळत आहेत.

हेही वाचा>> Crime News : धर्मांतराच्या संशयावरुन दोन आदिवासी महिलांना खांबाला बांधून मारहाण, चौघांना अटक; नेमकी कुठे घडली घटना?

या ऑनलाइन चर्चेदरम्यान गोवा सरकारने या दाव्याचे खंडन करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. सरकारने म्हटले होते की, एखाद्या राज्याची श्रीलंकेसारख्या एका देशाशी तुलना केल्याने चुकीचा समज होऊ शकतो. तसेच गोवा सरकारने सांगितले की, २०२३ मध्ये ८० लाखांहून अधिक देशांतर्गत पर्यटकांनी भेट दिल्यानंतर राज्याच्या पर्यटनात मोठी वाढ दिसून आली. या आकडेवारीने कोरोना काळापू्र्वीच्या आकड्यांनाही मागे टाकले आहे. तसेच गेल्या वर्षी ४.५ लाख परदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिल्याचेही सरकारने म्हटले आहे.

Story img Loader