गोव्यात गोमांसावर बंदी नाही, गोव्यात येणारे पर्यटक त्यांना हवे ते खाऊ शकतात, असे गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी म्हटले आहे. ‘गोव्यात येणारे पर्यटक त्यांचे आवडते पदार्थ खाऊ शकतात. केंद्र सरकारने पशू हत्या रोखण्यासाठी त्यांच्या विक्रीवर निर्बंध आणले आहेत. मात्र या निर्बंधाचा गोव्यातील पर्यटनावर कोणताही परिणाम होणार नाही,’ असे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारसह देशातील सर्वच राज्यांमधील भाजप सरकारांकडून गोवंश हत्याबंदीचा पुरस्कार केला जातो आहे. यासोबत गोमांस सेवन आणि गोमांस विक्रीवरदेखील राज्यांमधील भाजप सरकारांकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र गोवा सरकारने केंद्र सरकार आणि भाजपच्या गोमांस विषयीच्या भूमिकेच्या अगदी उलट भूमिका घेतली आहे. ‘गोव्यात गोमांसावर बंदी नाही. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना त्यांना हवे असलेले पदार्थ खाता येऊ शकतात. गोव्यातील पर्यटक त्यांचे आवडते खाद्य पदार्थ खाऊ शकतात,’ असे आजगावकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vinod Tawde pune, Mahayuti, Maratha Reservation,
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…!
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत

‘गोव्यात हिंदू, मुस्लिम, कॅथलिक लोक अनेक वर्षांपासून आनंदाने एकत्र राहतात. गोव्यातील वातावरण अतिशय सलोख्याचे आहे,’ असे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी म्हटले. गोव्यातील पर्यटन क्षेत्रावर केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कराचा प्रतिकूल परिणाम होणार नाही, असा विश्वास पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी आजगावकर यांच्या हस्ते टुरिझम फेअरमधील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

सुरक्षेचा मुद्दा गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचा विषय असल्याचे यावेळी पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी म्हटले. ‘सुरक्षा हा गोव्यातील पर्यटनाचा प्राधान्याचा मुद्दा आहे. यासाठी केंद्र सरकारने आधीच १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय पर्यटन क्षेत्राच्या जाहिरातींसाठी ५० कोटींचा खर्च करण्यात येईल,’ अशी माहितीदेखील आजगावकर यांनी दिली.

देशभरात १ जुलै रोजी वस्तू आणि सेवा कर लागू करताना ‘एक देश, एक कर’ अशी जाहिरातबाजी केंद्रातील भाजप सरकारकडून करण्यात आली होती. मात्र गोमांसाच्या मुद्यावर भाजपची ‘एक पक्ष, एक भूमिका’ पाहायला मिळालेली नाही. आता गोव्यात गोमांसबंदीविरोधी भूमिका घेणाऱ्या भाजपने याआधी ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये गोमांसबंदीविरोधात भूमिका घेतली आहे. मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने गोमांसबंदीविरोधात भूमिका घेत गोमांस विक्री आणि सेवनाचा मुद्दा लावून धरला आहे.