नासाच्या रेकनसान्स ऑरबायटर यानाने दिलेल्या प्रतिमांवरून मंगळाच्या पृष्ठभागाखालील पाण्याच्या कालवे, नदीपात्रांचा त्रिमिती छायाचित्रे तयार करून अभ्यास केला आहे. गेल्या काही वर्षांत या अंतराळयानाने मंगळाची अनेक छायाचित्रे टिपली असून त्यात मंगळावर महापुरामुळे नैसर्गिक कालवे, नदीपात्रे तयार झाल्याचे दिसत आहे. त्या काळात मंगळ हा थंड व कोरडा ग्रह मानला जात होता. या पुरांमुळे मंगळावरील हवामानात बदल झाले किंवा कसे याबाबत नवीन प्रकाश पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सहाशे मैलांचे नदीपात्र
पृथ्वीचा सहोदर मानलेल्या मंगळ ग्रहावर ५० कोटी वर्षांपूर्वी महापूर येत होते व तेथे पाणी वाहिल्यामुळे खोल कालवे नदीपात्रे तयार झाल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. तेथे ६०० मैल लांबीचे नदीपात्र तयार झाल्याचे छायाचित्रात दिसून आले आहे.

मंगळावर पुराच्या पाण्याने माती खरवडली जाऊन  ही नैसर्गिक नदीपात्रे तयार झाली, आतापर्यंत आपण समजत होतो त्यापेक्षा अधिक खोल अशा या मार्गिका तयार झाल्या आहेत.  मंगळाच्या पृष्ठभागाला पाण्याने कसा आकार मिळत गेला हे समजण्यास ऑरबायटल साउंडिंग रडारने नोंदलेल्या निरीक्षणांचा मोठा फायदा झाला आहे. – गॅरेथ मॉर्गन, मुख्य संशोधक

मंगळाचा भूगर्भीय इतिहास
मंगळावरील हे कालवे एलिसियम प्लानिशिया या भागात तयार झाले आहेत. हा भाग मंगळाचे विषुववृत्त व एका ज्वालामुखी प्रदेशाच्या दरम्यान पसरलेला आहे. गेले काही कोटी वर्षे ज्वालामुखीने एलिसियम प्लॅनिशिया या भागाला व्यापले होते. त्यामुळे मंगळाच्या भूगर्भीय इतिहासाच्या खुणा लुप्त झाल्या त्यात एक हजार किलोमीटर लांबीचा मार्शे व्हॅलिस हा कालवाही दिसेनासा झाला होता. मंगळावरील ख्राइस खोऱ्यातील कालव्यांसारखीच मार्शे व्हॅलिस कालव्याचीही संरचना होती.गाडल्या गेलेल्या नदीपात्रांचा नकाशा तयार करण्याचे अवघड काम नासा, वॉशिंग्टनची स्मिथसॉनियन इन्स्टिटय़ूट  व बोल्डर येथील साउथवेस्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट यांनी केले आहे. त्यांनी गाडल्या गेलेल्या कालव्यांच्या त्रिमिती प्रतिमा तयार करून कालव्यांच्या निर्मितीतील दोन टप्पेही उलगडले आहेत. तेथील दोन बेटांवर असे कालवे पाण्याने भरून वाहत होते. दुसऱ्या टप्प्यात अधिक खोलवर मार्गिका तयार झाल्याचे दिसून आले आहे.