Train Accident : ओडिशामधील बालासोरमध्ये एका रेल्वेला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. बालासोर जिल्ह्यातील साबिरा पोलीस स्टेशनजवळ न्यू जलपाईगुडी ट्रेन रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. तसेच रेल्वे रुळावरून घसरून एका विजेच्या खांबाला धडकल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. दरम्यान, रेल्वेतील कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. मात्र, ही रेल्वे रुळावरून कशामुळे घसरली? याबाबतचा तपास करण्यात येणार असल्याचं दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

ट्रेन रुळावरून घसरल्याच्या घटनेनंतर रेल्वेतील प्रवासी घाबरले होते. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं, यानंतर प्रवाशांनी बाहेर गर्दी होती असंही आता सांगण्यात येत आहे. न्यू जलपाईगुडी ट्रेन अचानक बंद पडल्याने प्रवासी डब्यातून बाहेर आले. यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. सध्या रेल्वे सुरळीत करून पुन्हा रेल्वे पाठवण्याची तयारी रेल्वे प्रशासन करत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामधून चेन्नईकडे ही रेल्वे जात होती. मात्र, मध्येच रेल्वे रुळावरून ही एक्स्प्रेस रुळावरून घसरली आणि विजेच्या खांबाला धडकली. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ओम प्रकाश चरण यांनी सांगितलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच याआधी ५ फेब्रुवारीला देखील ओडिशाच्या राउरकेला येथे मालगाडी रुळावरून घसरली आणि निवासी वसाहतीत घुसली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गाडी पाच मीटर पुढे गेली असती तर ती झोपड्यांवर आदळली असती आणि अपघात झाला असता.

बालासोरमध्ये गेल्या वर्षी घडली होती मोठी दुर्घटना

गेल्या वर्षी बालासोरमध्येच रेल्वे रुळावरुन घसरल्याची एक मोठी दुर्घटना घडली होती. त्या घटनेला एक वर्षाहून अधिक काळ लोटला. तेव्हा जिल्ह्यात बालासोरमध्ये तिहेरी रेल्वे अपघातात २९६ लोक ठार झाले होते आणि १,२०० हून अधिक जखमी झाले होते. ही घटना गेल्या अनेक वर्षांतील भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे दुर्घटनांपैकी एक होती.

Story img Loader