कुत्रा हा सर्वात इमानदार असा प्राणी समजलं जातं. यामुळे अनेक लोक घरात कुत्र्याला पाळतात. कुत्रा आणि माणसांमधील मैत्रीपूर्ण संबंध यापूर्वी आपण पाहिले आहेत. पण, आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे एका कुत्र्याला गेटवर लटकवल्याची क्रूर अशी घटना घडली आहे.
याप्रकरणी निलेश जैस्वाल नावाच्या व्यावसायिकानं रवी कुशवाह, नेहा तिवारी, तरूण दास यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निलेश जैस्वाल यांनी पाकिस्तानी जातीचा कुत्रा चार महिन्यांसाठी भोपाळमधील प्राणी प्रशिक्षण केंद्रात सोडला होता. तेव्हा हा प्रकार घडला आहे.
हेही वाचा : “मी पाच मिनिटात घरी पोहचते आहे..हा तिचा शेवटचा फोन..”, जिगीषाच्या आठवणीत आईला अश्रू अनावर
नेमकं काय घडलं?
चार महिन्यांआधी निलेश जैस्वाल यांनी प्राणी प्रशिक्षण केंद्रात कुत्र्याला सोडलं होतं. पण, जैस्वाल यांनी कुत्र्याला घरी नेण्यासाठी प्रशिक्षण केंद्राशी संपर्क साधला. तेव्हा, जैस्वाल यांना कुत्र्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र, संशय आल्यानं जैस्वाल यांनी प्रशिक्षण केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची मागणी केली. तेव्हा अंगावर थरकाप उडवणाची दृष्य समोर आली आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये रवी कुशवाह, नेहा तिवारी, तरूण दास कुत्र्याला अत्यंत क्रूर पद्धतीनं गेटला लटकवल्याचं दिसत आहे. लटकल्यानंतर कुत्र्यानं १० मिनिटं झुंज दिली. पण, श्वास गुदमरल्यानं कुत्र्याचा मृत्यू झाला. ही बाब समोर आल्यावर जैस्वाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना प्राण्यांवरील अत्याचार आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
हेही वाचा : धक्कादायक! शिक्षिकेनं चिमुरडीला लगावल्या ३५ कानशिलात; सीसीटीव्ही VIDEO त क्रूर वागणूक कैद…
आरोपींनी पोलिसांनी सांगितलं की, “कुत्र्यानं हिंसक रूप धारण केलं होतं. त्यामुळे प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून त्याला गेटवर बांधण्याचा प्रयत्न केलं. पण, कुत्र्याच्या गळ्यातील दोरी घट्ट झाली आणि तो बेशुद्ध पडला. यानंतर कुत्र्याला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. पण, डॉक्टरांनी कुत्र्याला मृत घोषित केलं.” दरम्यान, तिन्ही आरोपींना जामीन मिळाला आहे.