पीटीआय, नवी दिल्ली : भारतीयांमध्ये दुफळी माजवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणारेच खरे देशद्रोही आहेत, अशी खरमरीत टीका काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखामध्ये गांधी यांनी केंद्र सरकारवर घटनात्मक संस्थांचा गैरवापर करत असल्याचा तसेच त्या उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यघटनेवर पद्धतशीरपणे हल्ले केले जात असून त्याचा बचाव करण्यासाठी लोकांनी कृती करणे आवश्यक आहे, असे आवाहन गांधी यांनी केले. धर्म, भाषा, जात, लिंग यांच्या आधारावर भारतीयांमध्ये दुफळी माजवली जात आहे, त्यासाठी सत्तेचा गैरवापर करणारेच खरे देशद्रोही आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. घटनात्मक संस्थांचा गैरवापर करून त्या उद्ध्वस्त करण्याबरोबरच स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय यांचा पाया कमकुवत केला जात आहे. लोकांच्या हक्कांचे आणि समानतेचे संरक्षण करण्याऐवजी त्यांचा छळ केला जात आहे. बहुसंख्य भारतीय आर्थिक त्रास सहन करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये आवडत्या मित्रांना झुकते माप दिले जात आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.    

 स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर, सरदार पटेल आणि इतर अनेक नेत्यांमध्ये तीव्र मतभेद होते. त्यामधून आपल्या भविष्याविषयी गंभीर प्रश्नांविषयी निरनिराळे दृष्टिकोन मिळतात; पण त्या सर्वाचे अंतिम ध्येय भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे आणि  देशाला आकार देणे होते, हे विसरता कामा नये, असे गांधी यांनी म्हटले आहे.

देशात जाणीवपूर्वक द्वेषाचे वातावरण निर्माण करून भारतीयांमध्ये ध्रुवीकरण घडवले जात आहे आणि त्याद्वारे बंधुत्वाची भावना नष्ट केली जात आहे. त्याबरोबरच सुनियोजित पद्धतीने न्यायपालिकेविरोधात प्रचार करून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.

– सोनिया गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष