पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे. जगभरातील अनेक दिग्गज नेते, कलाकारांसह नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा दिल्ली मेट्रोतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका तरुणीने चक्क संस्कृत भाषेत गीत गात पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरं तर, पंतप्रधान मोदी यांनी आज येशोभूमी द्वारका सेक्टर २५ आणि येशोभूमी कन्वेंशन सेंटरचं उद्घाटन केलं. यावेळी मोदींनी दिल्ली मेट्रोतून प्रवास केला. यावेळी एका तरुणीने संस्कृत भाषेत गीत गाऊन पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या खास प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या तरुणीव्यतिरिक्त इतरही प्रवाशांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदींनी सामान्य लोकांशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी अनेकांनी मोदींबरोबर सेल्फी काढली.

दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेस लाइनचं द्वारका सेक्टर-२१ ते द्वारका सेक्टर २५ दरम्यान, नवीन मेट्रो स्टेशन यशोभूमीचं विस्तारीकरण करण्यात आलं आहे. या विकासकामाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. यावेळी पीएम मोदी धौला कुआ मेट्रो स्टेशनवरून मेट्रोमध्ये चढले. यावेळी त्यांनी दिल्ली मेट्रोच्या कर्मचाऱ्यांशीही चर्चा केली.