‘झाडे आपलं आई-वडिल, मुलं नातेवाईक आहेत’ असा नारा देणारे वृक्षमानव विश्वेश्वर दत्त सकलानी यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वृक्षमानव विश्वेश्वर यांनी ५० लाखांपेक्षा आधिक झाडे लावली आहेत. विश्वेश्वर यांनी यांनी आपलं संपूर्ण जिवन प्रकृतीसाठी समर्पित केले आहे.

विश्वेश्वर दत्त सकलानी यांनी बांज, बुरांश, सेमल, देवदारसारख्या वृक्षाचे घनदाट जंगल तयार केले. दुष्काळग्रस्त आणि पडीक जमीन त्यांनी सुजलम सुफलम बनवली. झाडामुळे ग्रामिण भागात पर्जन्यमानही वाढले.

विश्वेश्वर दत्त सकलानी यांचा जन्म दोन जून १९२२ रोजी झाला. लहानपणापासून ते आजी-आजोबाकडून पर्यावरण संरक्षणाच्या कथा ऐकून प्रकृतीबद्दल प्रेम आणि प्रेरणा मिळाली. त्यामुळे ८ वर्षापासून ते पर्यवरणासाठी झटले. पर्यावरणासोबत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले आहेत. देशाची अनेकवेळा तुरूंगवारीही भोगावी लागली. विशेश्वर दत्त सकलानी यांना १९ नोव्हेंबर १९८६ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी इंदिरा प्रियदर्शनी वृक्ष मित्र पुरस्कार देऊन सम्मानित केलं होतं

Story img Loader