प्रकृतीचे कारण देत बलात्कार प्रकरणातील खटल्यात आसाराम गैरहजर राहत आहे. मात्र आसारामच्या गैरहजेरीतही खटल्याची सुनावणी सुरू राहील, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे. आसारामच्या गैरहजेरीत सुनावणी घेण्याबाबत न्यायालयाने आमचा अर्ज दाखल करून घेतल्याचे सरकारी वकील आर.एल. मीणा यांनी सांगितले. ५ तारखेला आसाराम गैरहजर राहिला तरी बचाव पक्ष पीडित मुलीची उलटतपासणी घेईल. आसाराम सातत्याने गैरहजर राहत असल्याने खटल्याचे कामकाज ठप्प झाले आहे. किशोरवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपावरून आसाराम २ सप्टेंबरपासून जोधपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये आहे.
आसारामच्या गैरहजेरीतही खटल्याचे कामकाज होणार
प्रकृतीचे कारण देत बलात्कार प्रकरणातील खटल्यात आसाराम गैरहजर राहत आहे. मात्र आसारामच्या गैरहजेरीतही खटल्याची सुनावणी सुरू राहील, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
First published on: 02-05-2014 at 12:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trial in asarams case to continue even in his absence court