लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुत मिळाल्यानंतर केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविथी पार पडला. मात्र, लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून अटीतटीचं राजकारण पाहण्यास मिळत आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे. तर इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस खासदार के.सुरेश यांना उमेदवारी दिली. आता लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता निवडणूक होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडून काँग्रेस खासदार के.सुरेश यांना उमेदवारी देण्यात आल्याने तृणमूल काँग्रेसने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसकडून तृणमूल काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षांच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिनसलं असल्याची चर्चा रंगली आहे. तृणमूलच्या भूमिकेमुळे पहिल्याच अधिवेशनात इंडिया आघाडीत बिघाडी सुरु झाल्याची टीका होऊ लागली आहे.

हेही वाचा : Modi 3.0: देशाच्या इतिहासात फक्त तिसऱ्यांदाच घडतंय ‘असं’ काही; सत्ताधारी आणि विरोधकांमधील असहमतीचा परिणाम!

अभिषेक बॅनर्जी काय म्हणाले?

लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारी संदर्भात बोलताना तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून के सुरेश यांना नामनिर्देशित करण्यात आले. मात्र, के सुरेश यांना नामनिर्देशित करण्यापूर्वी काँग्रेसने तृणमूल काँग्रेस पक्षाची सल्लामसलत करायला हवी होती. मात्र, कोणतीही चर्चा केली नाही. याबाबत आमच्याशी संपर्क साधला गेला नाही. कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे दुर्दैवाने हा एकतर्फी निर्णय आहे”, असं अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीकडून लोकसभा उपाध्यक्षपदावर दावा करण्यात आला होता. यासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये चर्चा झाली. मात्र, या चर्चांमध्ये एकमत झालं नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून उपाध्यक्षपदाची मागणी मान्य न झाल्यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला.

राहुल गांधी काय म्हणाले?

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. फोनवरुन राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठीच्या एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. आम्ही विनंती मान्य करुन एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. पण लोकसभेचं उपसभापतीपद विरोधकांना मिळालं पाहिजे. मल्लिकार्जुन खरगे यांना फोन परत करणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी काल सांगितलं होतं. मात्र त्यांनी फोन केला नाही”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.