राज्यातील डाव्या आघाडीचे साम्राज्य २०११ च्या निवडणुकीत उलथून टाकल्यानंतर आता पंचायत निवडणुकीतही विजय मिळवून तृणमूल काँग्रेसने विजयाचे वर्तुळ पूर्ण केले असल्याचे मत ज्येष्ठ मंत्री सुब्रतो मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.
तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपूर्ण परिवर्तनाची हाक दिली होती. पंचायत निवडणुकीतही विजय मिळवून तृणमूल काँग्रेसने विजयाचे वर्तुळ पूर्ण केले. पक्षाने १७ पैकी १३ जिल्हा परिषदा काबीज केल्या असून काँग्रेसला केवळ मुर्शिदाबादमध्येच विजय मिळाला आहे. माकपला केवळ दोन जिल्ह्य़ांत विजय मिळाला आहे.
माकप आणि काँग्रेसने कितीही कारस्थान रचले तरी राज्यातील जनता तृणमूल काँग्रेसबरोबरच असल्याचे निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध होते. जनतेने अन्य पक्षांना सडेतोड जबाब दिला आहे, असेही मुखर्जी म्हणाले.

Story img Loader