पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे नेते स्वपन माझी आणि त्यांच्या दोन साथीदारांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळी माझी आपल्या दोन साथीदारांसह गाडीवर जात असताना आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली.
पक्षाच्या बैठकीला जात असताना घडला प्रकार
स्वपन माझी सकाळी पक्षाच्या बैठकीसाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचे दोन साथीदारही होते. कचुआ परिसरातील पिअर पार्कजवळ पोहोचताच आरोपींनी मांझी यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
आमदार परेशराम यांनी खुनाची भीती व्यक्त केली होती
कॅनिंग पश्चिमचे आमदार परेशराम दास यांच्याकडे काही दिवसांपूर्वी स्वपन मांझी यांनी आपल्या हत्येची भीती व्यक्त केली होती. आपली हत्या होण्याची भीती त्यांना वाटत होती. परेशराम यांनी मांझी यांना पोलिसांकडे घेऊन जाण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, त्या अगोदरच त्यांची हत्या झाली.
हल्लेखोरांकडून शिरच्छेद करण्याचा प्रयत्न
हल्लेखोर तिघांचाही शिरच्छेद करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गोळ्या आणि बॉम्बचा आवाज ऐकून गर्दी जमली आणि हल्लेखोर पळून गेले.