Assembly Election 2023 Date : हिमचाल प्रदेश आणि गुजरात राज्यांमधील निवडणुका संपल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर पूर्वेतील महत्त्वाच्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. त्रिपुरा, नागालँड, मेघालय या राज्यात विधानसभा निवडणूक घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> Pune Bypoll Election : पिंपरी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर! लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे जागा रिक्त

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार त्रिपुरा राज्यात येत्या १६ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी नागालँड आमि मेघालयमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. या तिन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल २ मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.

हेही वाचा >> Indigo Airlines : भाजपा खासदाराने उघडला विमानाचा आपत्कालीन दरवाजा? थोडक्यात अनर्थ टळला

नागालँड आणि मेघालयमधील निवडणूक कार्यक्रम

नागालँड आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये सोबतच निवडणूक घेण्यात येईल. या निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ७ फेब्रवारी आहे. तर ८ फेब्रुवारीपर्यंत अर्जांची छननी केली जाईल. १० फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. या दोन राज्यांमध्य येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होईल. तर २ मार्च रोजी मतमोजणी होईल.

हेही वाचा >> Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; ११ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती

त्रिपुरा विधानसभा निवडणूक कार्यक्रम

त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ जानेवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. उमेदवारांना ३० जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज करता येईल. ३१ जानवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. २ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. १६ फेब्रुवारी रोजी येथे मतदान होईल. तर २ मार्च रोजी मतमोजणीला केली जाईल.