तामिळनाडूतील चेन्नईमध्ये ५३५ कोटी रुपये घेऊन जाणारा ट्रक भररस्त्यात बंद पडल्याची घटना समोर आली आहे. संबंधित ट्रक आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेचे पैसे घेऊन जात होता. यावेळी काही तांत्रिक बिघाडामुळे हा ट्रक भररस्त्यात बंद पडला. त्यामुळे या ट्रकबरोबर ५३५ कोटी रुपये घेऊन जाणारा अन्य एक ट्रकही थांबवला. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित पैशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस पथकाची धांदल उडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा ट्रक बंद पडताच खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पोलिसांना सुरक्षेसाठी पाचारण करण्यात आलं. एकूण १०७० कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारे दोन ट्रक अशाप्रकारे चेन्नईच्या रस्त्यावर थांबल्याने चर्चांना उधाण आलं आहे. संबंधित दोन ट्रक चेन्नईतील तांबरम परिसरात उभे होते.

नेमकं काय घडलं?

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, हे दोन्ही ट्रक आरबीआयचे १०७० कोटी रुपये घेऊन चेन्नईवरून विल्लुपुरमकडे जात होते. या दोन ट्रकला १७ पोलिसांची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. संबंधित पैसे जिल्ह्यातील विविध बँकांना दिले जाणार होते. पण चेन्नईहून विल्लुपुरमकडे जात असताना यातील एक ट्रक वाटेतच बंद पडला.

५३५ कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात बंद पडल्याचं समजताच क्रोमपेट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही ट्रक चेन्नईतील तांबरम येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिद्धा’ येथे हलवण्यात आले. मॅकेनिक ट्रक दुरुस्त करू शकत नसल्यामुळे संबंधित दोन्ही ट्रक पुन्हा चेन्नईतील रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आले आहेत.