दिल्लीमधील सीमापुरी भागात बुधवारी रात्री ट्रक अंगावरुन गेल्याने चौघांचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत. पीडित दुभाजकावर झोपलेले असताना ट्रकने त्यांना चिरडलं. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. चौघांना उपचारासाठी तात्काळ जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी एकाचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू झाला, तर एका व्यक्तीने उपचारादरम्यान अंतिम श्वास घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमापुरी भागात रात्री १ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास काही लोक दुभाजकावर झोपलेले असताना भऱधाव वेगात असणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना चिरडलं. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी आहेत. दोघांचा घटनास्थळी तर तिसऱ्याचा रुग्णालयात जाताना आणि चौथ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्यांची ओळख पटली अशून करीम (५२), छोटे खान (२५), शाह आलम (३८), राहुल (४५) अशी त्यांची नावं आहेत. १६ वर्षीय मनिष आणि ३० वर्षीय प्रदीप जखमी आहेत. वाहनाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Story img Loader