पोर्टलँड (अमेरिका), (एपी)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमेरिकेचे राज्य मेनच्या ‘डेमोक्रॅटिक सेक्रेटरी ऑफ स्टेट’ शेन्ना बेलोस यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्राथमिक टप्प्यातील निवडणुकीत (प्रायमरी बॅलेट) उभे राहण्यास बंदी घातली आहे. अशी एकतर्फी कारवाई करणाऱ्या शेन्ना बेलोस या पहिल्याच निवडणूक अधिकारी ठरल्या आहेत. राज्यघटनेशी विद्रोह केल्याच्या तरतुदीनुसार बेलोस यांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा >>> दिल्लीत झुंडबळींसाठी भरपाई योजनेला मंजुरी

ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास पात्र ठरणार अथवा नाही, याबाबत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचाही निर्णय अपेक्षित आहे. तसेच कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायलायाने ट्रम्प यांच्यावर डिसेंबरच्या प्रारंभी १४ व्या घटनादुरुस्तीतील तिसऱ्या कलमांतर्गत या निवडणुकीसाठी अपात्र ठरवले होते. परंतु, गृहयुद्धकालीन तरतुदीअंतर्गत ट्रम्प यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवणार की नाही, यावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हा निर्णय लागू होणार नाही. गृहयुद्धकालीन तरतुदीनुसार विद्रोहात सहभागी व्यक्तीला घटनात्मक पदाची सूत्रे घेण्यावर बंदी आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक मोहीम यंत्रणेने म्हटले आहे की, ते निर्णयाला मेनच्या प्रांत न्यायालयात आव्हान देणार आहेत.