Trump begins deporting Indian migrants : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांविरुद्ध तीव्र कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार, अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना पुन्हा भारतात पाठवले जात आहे. अशा स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकेचे लष्करी विमान भारताकडे रवाना झाले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली असल्याचे वृत्त इंडिया टुडेने रॉयटर्सच्या हवाल्याने दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले की, सी-१७ विमान स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे. परंतु ते किमान २४ तासांपर्यंत पोहोचणार नाही.

ट्रम्प यांनी अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठ्या हद्दपारीचे आश्वासन दिले होते आणि यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने सुमारे १८,००० कागदपत्रे नसलेल्या भारतीय नागरिकांची प्रारंभिक यादी तयार केली आहे. दरम्यान अमेरिकेहून भारताच्या दिशेने निघालेल्या विमानात कितीजण आहेत, हे स्पष्ट झालेलं नाही.

भारताने नेमकी काय भूमिका मांडली होती?

अमेरिकेत बेकायदा स्थलांतरितांचा मुद्दा गाजत आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर म्हणाले होते, ‘कुठलेही कागदपत्रे नसलेल्या आणि अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांना भारतात वैध मार्गाने परत आणण्यासाठी भारताचे दरवाजे कायमच खुले आहेत.  अमेरिकेतील नेमक्या किती भारतीयांना परत आणता येईल, यासंबंधीची प्रक्रिया सुरू असून, अंतिम आकडा अद्याप निश्चित झालेला नाही. कायद्याने मुक्तसंचार असावा, या भूमिकेला सरकार म्हणून आमचा पाठिंबा आहे. जागतिक स्तरावर भारतीय कौशल्य आणि बुद्धिमत्तेला अधिकाधिक संधी मिळावी, अशी आमची इच्छा आहे. त्याच वेळी बेकायदा पद्धतीने कुणी कुठे जात असेल, तर बेकायदा स्थलांतराला आमचा विरोध आहे. कुठे बेकायदा घडले, तर त्याच्या बरोबरीने आणखी बेकायदा कृत्यांचा जन्म होतो. असे होणे अपेक्षित नाही’’

अमेरिकेत बेकायदेशीरपणे आलेल्या भारतीय स्थलांतरितांना परत घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे योग्य आहे ते करतील असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये म्हटले होते . दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर हे वक्तव्य आले.

पेंटागॉनने एल पासो, टेक्सास आणि सॅन दिएगो, कॅलिफोर्निया येथे अमेरिकन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या ५,००० हून अधिक स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी विमान सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत, लष्करी विमानांनी ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथे स्थलांतरितांना नेले आहे.