अमेरिकेला स्मार्ट भारतीय विद्यार्थ्यांची गरज असल्याने त्यांना देशातून बाहेर काढले जाणार नाही, असे आश्वासन अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. आम्हाला आवडो किंवा न आवडो, आम्ही अनेक लोकांना शिक्षण दिले आहे, अनेक हुशार लोकांना घडवले आहे आणि अशा लोकांची अमेरिकेला गरज असल्याचे ट्रम्प यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
परदेशी कर्मचाऱ्यांना नोक ऱ्यांची संधी देणे थांबवणार – ट्रम्प
यावेळी त्यांना कायदेशीर इमिग्रेशनसंदर्भात विचारण्यात आले असता ते म्हणाले की, हार्वर्ड विद्यापीठात जाऊन शिक्षण घेणाऱ्यांमध्ये आणि पहिले येणाऱ्यांमध्ये अनेक भारतीयांचा समावेश आहे. याठिकाणी शिक्षण घेऊन ते भारतात जातात आणि त्याठिकाणी व्यवसाय सुरू करतात. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळतो. याउलट अनेक भारतीयांना अमेरिकेतच राहून असे करायचे असते. त्यामुळे माझ्या मते अमेरिकेत अनेक वर्षे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर लगेचच देशाबाहेर काढले जाऊ नये, असे ट्रम्प यांनी एच १ बी व्हिसासंदर्भातील भूमिका स्पष्ट करताना म्हटले.
‘एच-१बी व्हिसा’ वादग्रस्तच! 
भारतातून येणारे लोक अमेरिकेत कौशल्याधारित नोकऱ्या पळवतात. त्यामुळे स्थलांतरित नसलेल्या कर्मचाऱ्यांना एच १ बी व्हिसा देण्याची पद्धतच बंद करण्याचा इरादा अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला होता. हा निर्णय घेतला गेल्यास भारताच्या निर्यातधिष्ठित वाढीला फटका बसेल, असे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी म्हटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा