प्रतिबंधित लसीशिवाय करोना व्हायरस निघून जाईल असं वक्तव्य आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. तसंच अमेरिकेत येत्या काळात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ९५ हजार किंवा त्यापेक्षाही पुढे जाईल. असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. खरंतर सध्या सगळं जग करोनाचा सामना करतं आहे. जगभरातल्या २०० देशांवर करोना नावाचं संकट कोसळलं आहे. अनेकांचा या रोगाची लागण झाल्याने मृत्यूही झाला आहे. अशात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही लसीशिवाय करोना निघून जाईल असं वक्तव्य केलं आहे. ‘द गार्डियन’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
Global report: Trump says Covid-19 will ‘go away without vaccine’, expects US death toll to top 95,000 https://t.co/iknDOBKL3a
— The Guardian (@guardian) May 9, 2020
नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
“करोना व्हायरस हा कोणत्याही लसीशिवाया निघून जाईल. असा दूर जाईल की आपण त्याला पुन्हा पाहूच शकणार नाही. आत्तापर्यंत अनेक आजार आले आणि कोणत्याही लसीशिवाय निघून गेले तसाच करोनाही जाईल. हे सगळं लगेच घडेल का? तर तसं माझं म्हणणं नाही. मात्र एक वेळ अशी येईल की करोना नाहीसा झालेला असेल.” असंही त्यांनी म्हटलं आहे.
अमेरिका हा असा देश आहे जिथे करोनामुळे आत्तापर्यंत ७५ हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. तर १३ लाखांपेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण झाली आहे.