एपी, वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर (आयसीसी) निर्बंध घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. इस्रायलची चौकशी करण्यावरून अमेरिकेने ‘आयसीसी’वर निर्बंध घातले आहेत. ‘आयसीसी’ने इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना अटक करण्याचे वॉरंट बजावले होते. अमेरिकेच्या या निर्णयाचा ‘आयसीसी’ने निषेध केला आहे.
या निर्बंधांमुळे अमेरिका किंवा इस्रायल दोन्ही देश ‘आयसीसी’चे सदस्य राहणार नाहीत. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी गाझा पट्टीत केलेल्या लष्करी कारवाईतील युद्ध गुन्ह्यांसाठी त्यांना अटक करण्याचे वॉरंट‘आयसीसी’ने बजावले होते.
हमासला दिलेल्या लष्करी प्रत्युत्तरात हजारो पॅलेस्टिनी मुो-महिलांसह मारले गेले. ‘‘आयसीसी’ अमेरिका आणि तिचा जवळचा मित्रदेश इस्रायलला अवैध मार्गाने आणि निराधार लक्ष्य करीत आहे. तसेच, नेतान्याहू आणि इस्रायलचे माजी संरक्षणमंत्री यांच्याविरोधात निराधार अटक वॉरंट बजावून अधिकाराचा गैरवापर करीत आहे. ‘आयसीसी’चे अधिकारक्षेत्र अमेरिका किंवा इस्रायलवर नाही. न्यायालयाने या कृतीतून अतिशय धोकादायक असा प्रघात पाडला आहे,’ असे अमेरिकेने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
ख्रिाश्चनविरोधातील पक्षपातीपणासाठी टास्क फोर्स
अमेरिकेतील ख्रिाश्चनविरोधातील पक्षपातीपणा समूळ नष्ट करायचा असून, त्यासाठी अॅटर्नी जनरल पाम बाँडी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करीत असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ख्रिाश्चन समुदायाला ‘लक्ष्य’ करण्यात येणाऱ्या प्रकरणांची चौकशी हा टास्क फोर्स करील.