Price Hike In US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच जगभरातील अनेक देशांवर ते अमेरिकेत निर्यात करत असलेल्या वस्तूंवर अतिरिक्त व्यापार कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फक्त निर्यातदार देशांनाच नाही तर अमेरिकन नागरिकांनाही फटका बसणार असल्याचे दिसत आहे. कारण अतिरिक्त व्यापार शुल्कामुळे अमेरिकन नागरिकांना परदेशातून आयात झालेल्या वस्तू चढ्या किमतींमध्ये विकत घ्याव्या लागण्याची शक्यता आहे. ज्या वस्तू महागणार आहेत, त्यामध्ये रे बॅन चष्म्यापासून सेक्स टॉइजपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या व्यापार करामुळे वाढणाऱ्या महागाईचा सर्वाधिक फटका लक्झरी कार आणि विशेष खाद्यपदार्थांसारख्या गोष्टींना बसणार आहे. दरम्यान अमेरिकेत आजापासून नवीन कर व्यापार कर लागू होत आहेत. त्यामुळे दैनंदिन सुपरमार्केट वस्तूंपासून ते शूजपर्यंत या सर्व वस्तूंच्या अतिरिक्त खर्चाचा किती भार ग्राहकांवर टाकायचा हे उत्पादक आणि पुरवठादारांच्या हातात असणार आहे. याबाबत ब्लूमबर्गने वृत्त दिले आहे.
रे-बॅन एव्हिएटर्स
रे-बॅन्स एव्हिएटर्स (चष्मे) हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या लूकचा अविभाज्य भाग आहेत. १९३० च्या दशकात पहिल्यांदा यूएस आर्मी एअर कॉर्प्सने तयार केलेले आणि नंतर टॉम क्रूझने टॉप गन चित्रपटांमध्ये वापरलेले हे आयकॉनिक सनग्लासेस माजी राष्ट्रपतींना त्यांची ऑल-अमेरिकन प्रतिमा तयार करण्यास फायदेशीर ठरले होते.
असे असले तरी, प्रत्यक्षात अमेरिकेसह जगभरात निर्यात होणारे रे-बॅन एव्हिएटर्स इटालियन डोलोमाइट्सवरील एका लहान गावात तयार केले जातात. त्यामुळे अमेरिकेत आयात होणाऱ्या या रे-बॅन एव्हिएटर्सवर आयात कर लागणार आहे. परिणामी त्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. यासह चष्मांच्या अनेक जगप्रसिद्ध ब्रँड्सची अमेरिकेत आयात होते. त्यामुळे त्यांच्याही किमती वाढणार आहेत.
सेक्स टॉईज
भारत आणि चीन हे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात सेक्स टॉइज निर्यात करतात. सेक्स टॉइजच्या जागतिक बाजारपेठत अमेरिकेचा वाटा तब्बल ७० टक्के इतका आहे. अशात भारतावर २६ टक्के आणि चीनवर ३४ टक्के व्यापार कर लादल्यामुळे अमेरिकेत सेक्स टाइजच्या किमतींमध्ये मोठी वाढ होणार आहे.
विग्ज
चीन हा जगातील सर्वात मोठा विग उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. २०२२ मध्ये त्यांची निर्यात अंदाजे ३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. चीनच्या अधिकृत शिन्हुआ न्यूज एजन्सीनुसार, जागतिक केसांच्या अॅक्सेसरीजच्या बाजारपेठेत त्यांचा वाटा सुमारे ८०% असून, अमेरिका त्याचा सर्वात मोठा आयातदार आहे.
हॉस्पिटल बेड्स
चेक रिपब्लिकमधील लिनेट ग्रुप हा हाय-टेक हॉस्पिटल बेड्सचा एक प्रमुख पुरवठादार आहे. ट्रम्प यांनी व्यावर कर लादल्यानंतर कंपनीने म्हटले आहे की, अमेरिकन क्लायंट्सबरोबरच्या भविष्यातील करारांसाठी, त्यांना किंमती वाढवाव्या लागतील. जास्त किंमत आणि जास्त नफा असलेल्या उच्च दर्जाच्या उत्पादनांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.