हश मनी प्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. २०१६ च्या निवडणुकीत पॉर्न स्टारबरोबरचे लैंगिक संबंध लपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भ्रष्टाचार केला होता, असं न्यू यॉर्कच्या सरकारी वकिलांनी सुनावणीत सांगितलं. मात्र हा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलांनी खोडून काढला. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणताही गुन्हा केला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टॉर्मी डॅनियल्स या पॉर्न अभिनेत्रीने ट्रम्प यांच्याबरोबर पूर्वी संबंध असल्याचा दावा करून त्यासंबंधी किस्से आणि आठवणी अमेरिकेतील काही प्रकाशकांकडे प्रसिद्धीसाठी पाठवल्या होत्या. त्यांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी ट्रम्प यांनी, २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना स्टॉर्मी डॅनियल्सला १,३०,००० डॉलर्स दिले. तसंच, नॅशनल इन्क्वायररचे माजी प्रकाशक डेव्हिड पेकर यांनीही काही किस्से आणि आठवणी लपवून ठेवण्यासाठी आणि ट्रम्प यांना निवडून आणण्यासाठी या योजनेत भाग घेतला होता. परंतु, ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच, पॉर्नस्टारबरोबरचे लैंगिक संबंध असल्याचाही दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.

“बेकायदेशीर खर्च करून डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून येण्यास मदत करण्यासाठी २०१६ च्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा हा एक नियोजित, समन्वित आणि दीर्घकाळ चाललेला कट होता”, असे फिर्यादी मॅथ्यू कोलान्जेलो यांनी सांगितले. तर, “निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात काहीही गैर नाही. त्याला लोकशाही म्हणतात. परंतु ट्रम्प यांनी भयंकर गुन्हा केला असल्याचं भासवलं जातंय”, असं ट्रम्पचे वकील टॉड ब्लँचे म्हणाले.

हेही वाचा >> विश्लेषण: ट्रम्प यांच्याविरोधातील ‘हश मनी’ खटला काय आहे? ट्रम्प यामुळे अडचणीत येतील का?

हश मनी प्रकरण काय?

स्टॉर्मी डॅनियल्स या पॉर्न अभिनेत्रीने ट्रम्प यांच्याबरोबर पूर्वी संबंध असल्याचा दावा करून त्यासंबंधी किस्से आणि आठवणी अमेरिकेतील काही प्रकाशकांकडे प्रसिद्धीसाठी पाठवल्या होत्या. त्यांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी ट्रम्प यांनी, २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना स्टॉर्मी डॅनियल्सला १,३०,००० डॉलर्स दिले. हे पैसे ट्रम्प यांचे सहकारी मायकेल कोहेन यांच्या वतीने ट्रम्प यांच्या सांगण्यावरून देण्यात आले. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर कधीतरी ट्रम्प यांनी कोहेन यांना ते पैसे परत केले. परंतु ही देयके कोहेन यांचे मानधन म्हणून देण्यात आल्याचे दाखवले गेले. यासंबंधी कोहेन यांच्याशी झालेल्या कराराची कागदपत्रे नकली असल्याचे न्यूयॉर्कच्या सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.

ट्रम्प सकृतदर्शनी दोषी केवळ स्टॉर्मी डॅनियल्स हश मनी प्रकरणातच आढळले आहेत. पण आणखीही काही प्रकरणे उजेडात आली आहेत. या सगळ्या प्रकरणांच्या प्रसिद्धीचे हक्क असलेल्या प्रकाशकांना मोठ्या रकमा देऊन ती मिटवून टाकण्याचा आणि त्याद्वारे अप्रत्यक्षपणे २०१६मधील निवडणूक प्रचारावर प्रभाव टाकण्याचा व्यापक कट ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला, याविषयीदेखील या खटल्यामध्ये भर दिला जाणार आहे. ‘नॅशनल एन्क्वायरर’ या ट्रम्प यांच्याशी संबंधित असलेल्या टॅब्लॉइड पत्राने दोन प्रकरणांमध्ये ‘हश मनी’ वाटल्याचा आरोप आहे. यांतील एका प्रकरणात ट्रम्प टॉवरमधील एका कर्मचाऱ्याला ३० हजार डॉलर दिले गेले. ट्रम्प यांना एका विवाहबाह्य संबंधातून अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा या कर्मचाऱ्याने केला होता. तो नंतर तथ्यहीन निघाला, तरी तोवर हा कर्मचारी गप्प राहावा यासाठी पैसे पाठवले गेले होते. दुसऱ्या प्रकरणामध्ये कॅरेन मॅकडूगल या माजी प्लेबॉय मॉडेलने ट्रम्प यांच्याशी पूर्वी असलेल्या प्रेमसंबंधांची वाच्यता करण्याचा निर्णय, ट्रम्प यांचा २०१६मधील निवडणूक प्रचार सुरू असताना घेतला. तिने याविषयीची कहाणी काही प्रकाशकांकडून मागे घ्यावी यासाठी १,५०,००० डॉलर देण्यात आल्याचा आरोप आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trump tried to corrupt the 2016 election prosecutor alleges sgk
Show comments